Marathi News> मनोरंजन
Advertisement

पारदर्शक पडद्याआडून अभिनेत्रीचं मादक सौंदर्य समोर; पाहणारे सैरभैर

ही अभिनेत्री एका जाळीदार पडद्याआड जाते आणि... 

पारदर्शक पडद्याआडून अभिनेत्रीचं मादक सौंदर्य समोर; पाहणारे सैरभैर

Viral Video : काही अभिनेत्री या त्यांच्या मादक सौंदर्यासाठी ओळखल्या जातात. हिंदी चित्रपटसृष्टीतही अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत, ज्या त्यांच्या अभिनयाहूनही त्यांच्या बोल्ड अंदाजासाठी चर्चेचा विषय ठरतात. 

याच यादितील एका अभिनेत्रीनं नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री पांढऱ्या रंगाचा सोनसाखळी असणारा सुरेख गाऊन घातला आहे. 

बॉडीकॉन गाऊनमध्येच ही अभिनेत्री एका जाळीदार पडद्याआड जाते आणि तिथूनच तिचा कमनीय बांधा सर्वांच्या नजरेत येतो. हा तोच क्षण आहे, जो पाहताना नेटकरीही सैरभैर होत आहेत. 

ही अभिनेत्री आहे, ईशा गुप्ता. 'आश्रम 3' (Aashram 3) या वेब सीरिजमधील बोल्ड दृश्यांमुळं ईशा चर्चेत आली आणि आता सोशल मीडियावर तिनं बोल्ड अदांच्या पोस्ट करण्याचं सत्र सुरु ठेवलं आहे. (Aashram 3 fame actress Esha Gupta shares bold video)

कधी बिकीनी, कधी मिनी स्कर्ट, कधी बॉडीकॉन ड्रेस किंवा मग कधी डीप नेक ब्लाऊज वर साजेशी साडी असा लूक करत ईशा वेळोवेळी काळजाचे ठोके वाढवणाऱ्या स्टाईल स्टेटमेंट सर्वांच्या भेटीला आणताना दिसते. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Esha Gupta (@egupta)

बॉलिवूडमध्ये ईशाला फारसं यश मिळालं नाही, पण वेब सीरिज आणि मॉडेलिंग विश्वानं मात्र तिला बरीच लोकप्रियता मिळवून दिली आहे. मिस इंडिया इंटरनॅशनल हा किताब आपल्या नावे करणाऱ्या या अभिनेत्रीला भारतातील अॅजेलिना जोली म्हणूनही ओळखलं जातं. 

Read More