Abhijeet Sawant was on Dating App : 'इंडियन आयडल' फेम सिंगर अभिजीत सावंतच्या आवाजची आजही तरुणाईमध्ये क्रेझ आहे. अभिजीत सावंतनं अलीकडेच एका मुलाखतीत खुलासा केला की काही वर्षांपूर्वी तो ऑनलाइन डेटिंग प्लॅटफॉर्म 'टिंडर'वर होता. त्यानं सांगितलं की लग्नानंतर काही वर्षांनी त्यानं टिंडर वापरायला सुरुवात केली होती. पण जेव्हा लोकांना हे समजलं की तो टिंडरवर आहे, तेव्हा त्यानं हे अॅप वापरणं बंद केलं. महत्त्वाचं म्हणजे त्याची पत्नी शिल्पा सावंतला याबद्दल काहीच माहिती नव्हतं.
अभिजीतनं ही मुलाखत 'हिंदी रश' ला दिली. या मुलाखतीत त्यानं सांगितलं की त्यानं टिंडरवर दोन-तीन महिलांशी गप्पा मारल्या होत्या. त्याविषयी सांगत तो म्हणाला, 'माझा स्वभाव जरा काहीतरी नवीन ट्राय करून पाहण्याचा आहे. एकदा मी माझ्या मित्रासोबत अमेरिकेत होतो, तेव्हा त्यानं सांगितलं की हे एक नवं अॅप आहे डेटिंगसाठी. मग मी तिथे प्रोफाईल तयार केलं. कधी कधी बघायचो काय आहे हे अॅप, काय चालतंय. मी माझंच नाव टाकलं होतं. काही खोटं नव्हतं. पण बायकोला काहीच माहीत नव्हतं. असं असलं तरी मी कुणालाच प्रत्यक्षात भेटलो नाही, काही खास झालं नाही.'
मला गप्पा मारायला खूप आवडतं हे सांगत अभिजीत म्हणाला, 'टिंडरवर काही मुलींशी खूप छान गप्पा झाल्या. दोन-तीन मुली भेटल्या ज्या छान बोलायच्या. नंतर वाटलं की ट्विटरवर माझं अकाउंट आहे आणि लोकांना हे माहिती झालं तर कदाचित चांगलं वाटणार नाही. म्हणून मग बंद केलं.'
अभिजीतनं हे मान्य केलं की त्याच्या पत्नीला याविषयी काहीच माहित नव्हतं. हे सांगत तो म्हणाला, 'आता तिला कदाचित समजेल. हे ओपन अकाऊंट आहे. जे काही करायचे ते कोणतीही भीती बाळगता करायचं नाही, पण मी सगळं काही कसं सांभाळू शकतो?'
हेही वाचा : 'बागबान'मध्ये बिग बींच्या मुलाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यानं सोडली सिनेसृष्टी; आता करणार जादूचे प्रयोग
अभिजीतच्या लग्नाविषयी बोलायचं झालं तर 2007 मध्ये त्यानं शिल्पासोबत सप्तपदी घेतल्या. ते दोघं एकाच कॉलनीत लहाणाचे मोठे झाले आणि लहानपणापासूनच ते एकमेकांना खूप चांगले ओळखायचे. त्यांना दोन मुलं आहेत. सोनाली आणि अमित अशी त्यांच्या मुलांची नावं आहे. दोघांनी एकत्र ‘नच बलिए’ सीझन 4 मध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता.