Marathi News> मनोरंजन
Advertisement

मावा खातोस का बे तू? असा प्रश्न विचारणाऱ्याला Abhinay Bearde चं सडेतोड उत्तर

Abhinay Bearde  मावा खातो? नेटकऱ्याने असा प्रश्न का विचारला... शेवटी अभिनय बोल्ला...   

मावा खातोस का बे तू? असा प्रश्न विचारणाऱ्याला Abhinay Bearde चं सडेतोड उत्तर

मुंबई : अभिनेता अभिनय बेर्डेसध्या 'मन कस्तुरी रे' सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमा 4 नोव्हेंबर रोजी मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे. सध्या अभिनेता आगामी सिनेमाचं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. ‘मन कस्तुरी रे’ सिनेमाचा नुकताच म्युझिक लाँच कार्यक्रम पार पडला आहे. म्युझिक लाँच झाल्यानंतर अभिनय सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली, पण ही पोस्ट शेअर करणं अभिनेत्याला महागात पडलं आहे. या पोस्टमुळे अभिनयला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. 

अभिनयची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर एका नेटकऱ्याने त्याला मावा खातोस का बे तू? असा प्रश्न विचारला. यावर अभिनेत्याने नेटकऱ्याला सडेतोड उत्तर दिलं आहे. अभिनयने नेटकऱ्याच्या प्रश्नावर 'मावा नाही खात पण मवाली आहे मी...' असं उत्तर दिलं. 

fallbacks

महत्त्वाचं म्हणजे सिनेमात अभिनेत्री तेजस्वी प्रकाश मुख्य भूमिकेत दिसणार आहे.  अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. छोट्या पडद्यावर आपली छाप सोडल्यानंतर तेजस्वी आता मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. 

fallbacks

तेजस्वीचा 'मन कस्तुरी रे' हा पाहिला मराठी सिनेमा लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तेजस्वी प्रकाशने आत्तापर्यंत 'संस्कार -धरोहर अपनों की', 'स्वरांगिनी- जोडे रिश्तों के सूर', 'पहरेदार पिया की', 'सिलसिला बदलते रिश्तों का', 'नागिन' अशा अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. तेजस्वीच्या चाहत्यांसाठी तिचा हा मराठी चित्रपट एक ट्रीट असेल.

Read More