Marathi News> मनोरंजन
Advertisement

अभिषेक-ऐश्वर्यामध्ये बिनसलं; लाडकी जोडी घेणार घटस्फोट?

अनेकदा ही जोडी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. दोघांचंही फॅनफॉलोईंग सोशल मीडियावर फार मोठं आहे.  मात्र यावेळी या दोघांबद्दल एक अशी चर्चा होतेय जे जाणून तुम्हालाही धक्का बसेल.

अभिषेक-ऐश्वर्यामध्ये बिनसलं; लाडकी जोडी घेणार घटस्फोट?

मुंबई : अभिनेता अभिषेक बच्चन  (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या (Aishwarya Rai) हे बॉलिवूडचं लाडकं कपल आहे. अनेकदा ही जोडी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. दोघांचंही फॅनफॉलोईंग सोशल मीडियावर फार मोठं आहे.  मात्र यावेळी या दोघांबद्दल एक अशी चर्चा होतेय जे जाणून तुम्हालाही धक्का बसेल. नुकत्याच पार पडलेल्या  नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचा उद्धाटन सोहळा खूप चर्चेत होता. कारण तिथे बऱ्याच सेलिब्रीटींनी हजेरी लावली होती. 

एकीकडे ऐश्वर्याने आराध्यासोबत लावलेली हजेरी, त्यानंतर तिचा आणि सलमान खानचा एडिट केलेला व्हायरल व्हिडिओ. मात्र आता आम्ही तुम्हाला या जोडीबद्दल सुरु असणाऱ्या चर्चेबद्दल सांगणार आहेत. नुकतीच  नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचा उद्धाटन सोहळ्याला ऐश्वर्याने लेकीसोबत हजेरी लावली होती. मात्र कायम सगळ्या कार्यक्रमांना अभिषेक आणि ऐश्वर्या एकत्र जातात. आणि यावेळीच ते एकत्र न दिसल्याने या दोघांमध्ये बिनसल्याच्या बातमीने आता जोर धरला आहे. त्यामुळे चाहते आता गोंधळात पडले आहेत.

अभिषेक बच्चनने या भव्यदिव्य सोहळ्यात हजेरी लावली नव्हती. याच कारणाने आता ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यात बिनसलं असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. तसेच ते लवकरच घटस्फोट घेणार असल्याचीदेखील चर्चा आहे. 

गेल्या काही दिवसांपासून अभिषेक आणि ऐश्वर्यामध्ये दुरावा आल्याची चर्चा आहे. तसंच ऐश्वर्या आणि आराध्या वेगळ्या राहत असल्याचं देखील म्हटलं जात आहे. जरी अशा चर्चा गेले अनेक दिवस सुरु असल्या तरी या दोघांनी अद्याप त्यांच्या नात्याबद्दल अधिकृतरित्या भाष्य केलेलं नाही. 

काही दिवसांपुर्वी सुभाष घई यांच्या पार्टीतील अभिषेक आणि ऐश्वर्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या अभिषेकवर रागावलेली दिसत होती.  या व्हिडीओवर 'अनहॅपी रिलेशनशिप' अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या होत्या. यानंतर हे कपल वेगळं होणार असल्याचं बोललं जात होतं.  

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय 2007 साली लग्नबंधनात अडकले. त्यानंतर 2011 साली ऐश्वर्याने आराध्याला जन्म दिला. या 15 वर्ष एकत्र राहिल्यानंतर या जोडीने अनेक चढ-उतारांचा सामना केला आहे. आजही ही जोडी मनोरंजन विश्वातल्या आदर्श जोडप्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते. दोघांचाही मोठा चाहतावर्ग असून दोघांच्याही नात्यात आलेला दुरावा कमी व्हावा अशी इच्छा चाहते व्यक्त करत आहेत. 

Read More