Marathi News> मनोरंजन
Advertisement

Abhishek Bachchan Hospitalised : अभिषेक बच्चनला दुखापत, बिग बी श्वेतासोबत रूग्णालयात पोहोचले

अभिषेक बच्चनला दुखापत, कारण अद्याप अस्पष्ट 

Abhishek Bachchan Hospitalised : अभिषेक बच्चनला दुखापत, बिग बी श्वेतासोबत रूग्णालयात पोहोचले

मुंबई : अमिताभ बच्चन यांच्यासह संपूर्ण बच्चन कुटुंबिय चिंतेत आहेत. अभिनेता अभिषेक बच्चनला दुखापत झाली आहे. ही दुखापत कुठे झाली? कशी झाली? त्याची तिव्रता किती आहे? याबाबत अद्याप कोणतीच माहिती नाही. मात्र मिळालेल्या रिपोर्टनुसार, अभिषेकला दुखापत झाल्यानंतर 22 ऑगस्ट रोजी रविवारी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

'झूम'च्या रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन मुलगी श्वेतासोबत अभिषेकला पाहण्यासाठी रुग्णालयात गेले होते. यावेळी अमिताभ बच्चन हुडी घालून पूर्ण चेहरा मास्कने झाकून होते. सोशल मीडियावर अभिषेक बच्चनचा फोटो देखील व्हायरल होत आहे. ज्यामध्ये उजव्या बाजूला दुखापत झाली आहे. 

मात्र अभिषेकला कोणती दुखापत झाली? कशी दुखापत झाली? किती दुखापत झाली? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे अनुत्तरीत आहेत. मात्र बच्चन कुटुंबीय रूग्णालयात दिसल्यामुळे ही दुखापत गंभीर तर नाही ना? असा प्रश्न चाहत्यांना पडत आहे.

हल्लीच अभिषेक बच्चन एअरपोर्टवर दिसला होता. यावेळी ऐश्वर्या राय आणि बेटी आराध्या त्याला सोडायला गेल्या होत्या. ऐश्वर्या ओरछाला रवाना झाली. जिथे तिच्या मणिरत्नम सिनेमाचं शुटिंग करण्यात आलं. ऐश्वर्या आता शुटिंगवर आहे. या सिनेमात तिचा डबल रोल आहे. 

तर अभिषेक बच्चन 'बॉब बिस्वास'मध्ये दिसणार आहेत. हा सिनेमा सुजॉय घोषच्या 'कहानी' सिनेमाचा स्पिन ऑफ सिनेमा आहे. तसेच 'दसवी' सिनेमांतही दिसणार आहे. यामध्ये तो अशिक्षित नेत्याची भूमिका साकारणार आहे. 

Read More