Marathi News> मनोरंजन
Advertisement

'या' गंभीर आजारामुळे शाळेत नेहमी सर्वांच्या मागे राहयचा अभिषेक बच्चन; वाचता-लिहिणं तर लांब बोलता येणंही कठीण

Abhishek Bachchan was diagnosed with this disease : अभिषेक बच्चननं एका मुलाखतीत त्याला झालेल्या या गंभीर आजाराविषयी सांगितलं होतं. 

'या' गंभीर आजारामुळे शाळेत नेहमी सर्वांच्या मागे राहयचा अभिषेक बच्चन; वाचता-लिहिणं तर लांब बोलता येणंही कठीण

Abhishek Bachchan was diagnosed with this disease : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन हा नेहमीच वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत राहतो. त्याचे चित्रपट त्याच्या अभिनय आणि त्याचा फिटनेस हा अनेकदा चर्चेचा विषय ठरतो. अनेकदा तो इतके मोठे मोठे डायलॉग्स कसे काय बोलतो असा देखील प्रश्न अनेकांना येतो. अनेकांना तर त्याचं कौतूक वाटतं. दरम्यान, तुम्हाला माहितीये का की एक काळ असा होता जेव्हा 9 वर्षांच्या वयापर्यंत तो इतक्या मोठ्या आणि गंभीर आजारानं त्रस्त होता. 

अभिषेक बच्चनला 9 वर्षांचा होऊ पर्यंत डिस्लेक्सिया नावाचा आजार झाला होता. ते पाहता त्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागला. अभिषेकनं त्याच्या आजाराविषयी बोलताना सांगितलं की 9 वर्षांपर्यंत अभ्यासात तो कच्चा होता. त्याचं कारण त्याला असलेला डिस्लेक्सिया हा गंभीर आजार. अभिषेक बच्चन शिक्षण हे यूरोपियन शाळेत झाले. तिथे अशा प्रकारच्या समस्या असणाऱ्या मुलांसाठी खूप चांगल वातावरण तयार करण्यात येतं. त्यांच्यावर मेहनत घेता येते. 

नेमकं डिस्लेक्सिया काय आहे? 

डिस्लेक्सिया एक असा गंभीर आजार आहे ज्या मुळे मुलाला अभ्यास, लिहिण्यासाठी आणि बोलण्यात अडचणी येतात. या लर्निंग डिसऑर्डरमुळे मुलांना अक्षर ओळखायला आणि बोलायला अडचणी येतात. पण ज्या मुलांना हा आजार झालेला ते कोणत्याही प्रकारे इतर मुलांच्या तुलनेत कमी हुशार वगैरे नसतात. ते खूप जास्त क्रिएटिव्ह असतात पण ते कोणाला बोलू शकत नाहीत. सर्वसामान्यपणे हा आजार बालपणीच होतो. 

आमिर खाननं 'या' विषयावर बनवला चित्रपट

अभिषेक बच्चनला जो गंभीर आजार झाला आहे त्याच आजारावर आमिर खाननं चित्रपट बनवला आहे. हा चित्रपट म्हणजे तारे जमीनपर या चित्रपटात दाखवण्यात आलेली गोष्ट ही एका डिस्लेक्सिया झालेल्या मुलाची आहे. या चित्रपटात दर्शील सफारीनं या आजारानं त्रस्त मुलाचा भूमिका साकारली होती.

Read More