Marathi News> मनोरंजन
Advertisement

आयुष्मान खुराना 'या' आगामी सिनेमात दिसणार

नव्या सिनेमासाठी आयुष्मानचा खास प्रयत्न 

आयुष्मान खुराना 'या' आगामी सिनेमात दिसणार

मुंबई : 'विक्की डोनर', 'बाला', 'आर्टिकल १५', 'ड्रिम गर्ल' सारख्या सिनेमात उत्कृष्ठ अभिनय करणारा आयुष्मान खुराना सध्या खूप चर्चेत आहे. आयुष्मान लवकरच एका नव्या सिनेमात रोमँटिक अंदाजात दिसणार आहे. 'केदारनाथ' सिनेमाचे दिग्दर्शक अभिषेक कपूरसोबत पहिल्यांदाच आयुष्मान काम करणार आहे. रोमँटिक ड्रामा सिनेमात आयुष्मान 'क्रॉस फंक्शनल एथलीट'ची भूमिका साकारत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सिनेमाचं शुटिंग ऑक्टोबर महिन्यात सुरू होणार आहे. सिनेमाटी गोष्टी उत्तर भारतावर आधारित आहे. या सिनेमाकरता आयुष्मान आपल्या शरीरावर मेहनत करत आहे. मात्र अजून सिनेमाचं नाव ठरलेलं नाही. 

'विक्की डोनर' सिनेमातून करिअरला सुरूवात केलेल्या आयुष्मान खुरानाने रोमँटिक कॉमेडी ते गंभीर रोल देखील साकारले आहे. आयुष्मानचा लॉकडाऊनच्या काळात अमिताभ बच्चनसोबतचा 'गुलाबो सिताबो' सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk) on

आयुष्मान खुरानाच्या आगामी सिनेमाबाबत प्रेक्षकांना अतिशय उत्सुकता आहे.

Read More