Marathi News> मनोरंजन
Advertisement

अनुराग कश्यपला राक्षण म्हणणाऱ्या अभिनेत्रीवर ऍसिड हल्ला

अभिनेत्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

अनुराग कश्यपला राक्षण म्हणणाऱ्या अभिनेत्रीवर ऍसिड हल्ला

मुंबई : बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपवर अभिनेत्री पायल घोषने लैंगिक अत्याचाराचे आरोप लावणारी अभिनेत्री पायल घोष पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.  सध्या पायलचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिच्यावर झालेल्या ऍसिड हल्ल्याबद्दल बोलताना दिसत आहे. सध्या पायलचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. शिवाय पायलच्या चाहत्यांनी व्हिडिओ पाहून चिंता व्यक्त करत आहेत. सध्या व्हायरल होत असलेला पायलचा व्हिडिओ तिने सोमवारी सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

व्हिडिओमध्ये पायल म्हणते, 'हाय... मी पायल घोष आहे. मी काही औषध खरेदी करण्यासाठी मेडीकलमध्ये गेली होती. त्यानंतर मी जेव्हा ड्रायव्हिंग सीटवर बसण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा त्याठिकाणी काही लोक आले आणि त्यांनी माझ्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या हातात एक बॉटल होती.'

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे ती म्हणाली, 'माझ्या मते त्यांच्या हातात ऍसिड होता. त्यांच्या हातात रॉड देखील होते. त्यांचा रॉड माझ्या हाताल लागला. ज्यामध्ये मी जखमी झाले. त्यानंतर मी आरडाओरडा केला त्यानंतर ते सगळे पळून गेले. त्यामुळे मी आता एफआरआय दाखल करणार आहे...' पायलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

कोण आहे अभिनेत्री पायल घोष?
पायल घोष एक अभिनेत्री आहे. जिने दक्षिण आणि हिंदी सिनेमात काम केलं आहे. पायल घोषने २०१७ मध्ये ऋषि कपूर यांच्या 'पटेल की पंजाबी शादी' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. कोलकाताची राहणारी पायलने 'सेंट पॉल्स मिशन' शाळेत शिक्षण तर स्कॉटिश चर्च कॉलेजमधून पदवीचं शिक्षण घेतलं. सध्या ती मुंबईत राहत आहे. 

Read More