Marathi News> मनोरंजन
Advertisement

अॅक्शन सुपरस्टार जॅकी चॅनची मुलगी बेघर

जगभरात लोकप्रिय असलेला, अॅक्शन सुपरस्टार जॅकी चॅनची मुलगी सध्या रस्त्यावर राहत आहे. 

अॅक्शन सुपरस्टार जॅकी चॅनची मुलगी बेघर

शांघाय : जगभरात लोकप्रिय असलेला, अॅक्शन सुपरस्टार जॅकी चॅनची मुलगी सध्या रस्त्यावर राहत आहे. जॅकी चेनच्या मुलीने केलेल्या आरोपांनुसार, ती लेस्बियन असल्याने तिच्या पालकांनी तिला घराबाहेर काढले आहे, सध्या माझ्याकडे राहण्यासाठी घर नसल्याने माझ्यावर रस्त्यावर राहण्याची वेळ आल्याचं जॅकी चेनच्या मुलीने म्हटलं आहे.जॅकी चॅनच्या मुलीचं नाव एटा एनजी असं आहे. आई-वडिलांमुळे मी एका महिन्यापासून बेघर आहे, कारण त्यांना समलिंगी संबंधांचा तिरस्कार आहे. मी अनेक रात्री पुलाच्या खाली घालवल्या, आम्ही पोलिस, रुग्णालय, फूड बँक, एलजीबीटीक्मयू समाजाकडे गेलो, पण कुणीही आमची मदत करत नाहीय. 

नेमकं आता करायचं तरी काय, आम्ही कुठे जायचं हा प्रश्न माझ्यासमोर आहे, मी अतिशय कठीण परिस्थितीतून जात आहे, नेमकं काय करावं, कुणाला सांगावं, काही कळत नाहीय. आमची कुणीही मदत का करत नाहीय, हे खूप वाईट आहे, असं एटा एनजीने म्हटलं आहे. यावर जॅकी चेनची अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. जॅकी चॅन सध्या चीनमधील शहर शांघायमध्ये राहतो.

Read More