Bollywood Biggest Flop Film: 2022 मध्ये बॉलिवूडमधील एका सुपरस्टारने चार वर्षानंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले होते. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होताच फ्लॉप ठरला. या चित्रपटात मुख्य भूमिकेत असणाऱ्या अभिनेत्याने अलीकडेच या चित्रपटासंदर्भात मोठा खुलासा केला आहे. ज्यामध्ये त्याने सांगितले की, चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर त्याने कोणतीही फी घेतली नव्हती. कोण आहे हा अभिनेता? पाहूयात सविस्तर
सुपरस्टार आमिर खानने 1988 मध्ये 'कयामत से कयामत तक' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तो नेहमी चित्रपट रिलीज झाल्यानंतर फी घेण्यावर निर्णय घेतो. जर चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला आणि चित्रपटाने चांगली कमाई केली तर आमिर खान फी घेण्याचा निर्णय घेतो. परंतु, जर चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नाही तर तो चित्रपटासाठी कोणतेही शुल्क आकारत नाही. काही दिवसांपूर्वीच आमिर खानने खुलासा केला होता की, 'लाल सिंग चढ्ढा' या चित्रपटासाठी त्याने कोणतीही फी घेतली नव्हती. कारण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होताच फ्लॉप ठरला.
'प्रेक्षकांना चित्रपट समजला नाही'
एबीपी लाईव्ह समिटमध्ये आमिर खानने खुलासा केला होता की, त्याने त्याच्या शेवटच्या चित्रपट 'लाल सिंग चढ्ढा' साठी कोणतेही शुल्क घेतले नाही. त्यावेळी तो म्हणाला की, आपण सर्वजण वाईट चित्रपट बनवत आहोत. मी कोणाचेही नाव घेऊ शकत नाही. कारण आपण सर्वजण मिळून चूक करत आहोत. कारण आमिर खानचा शेवटचा चित्रपट 'लाल सिंग चढ्ढा' हा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. त्यावेळी अभिनेत्याला खूप वाईट वाटले होते.
पुढे तो म्हणाला की, जर एखादा चांगला चित्रपट असेल तर त्याला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. जर एखादा चित्रपट प्रेक्षकांना चांगला वाटत नसेल तर कधीच यशस्वी होऊ शकत नाही. परंतु, मी असा दावा करत आहे की, माझा 'लाल सिंग चढ्ढा' हा चित्रपट खूप चांगला होता पण प्रेक्षकांना तो समजला नाी. जर प्रेक्षकांना मनोरंजन हवे असेल तर यापुढे आपल्याला त्यावर काम करावे लागेल असं आमिर खान म्हणाला.
आमिर खानच्या या चित्रपटात करीना कपूर देखील मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटासाठी 180 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. या चित्रपटाने जगभरात फक्त 133 कोटी रुपयांची कमाई केली आहे.