Marathi News> मनोरंजन
Advertisement

अल्लू अर्जुनला रश्मिकाने नाही दाखवली ओळख? वाचा काय आहे नेमकं प्रकरण

त्याचप्रमाणे या चित्रपटाचे संवादही प्रचंड हिट झाले. 

अल्लू अर्जुनला रश्मिकाने नाही दाखवली ओळख? वाचा काय आहे नेमकं प्रकरण

Allu Arjun: मागच्या वर्षी प्रदर्शित झालेला अल्लू अर्जुनचा 'पुष्पा द राइज' हा चित्रपट भारतात सर्वात जास्त लोकप्रिय ठरला. प्रेक्षकांनी 'पुष्पा' या चित्रपटाचे भरपुर कौतुक केले तसेच या चित्रपटाची गाणीही भलतीच फेमस झाली. त्याचप्रमाणे या चित्रपटाचे संवादही प्रचंड हिट झाले. 

अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदाना ही अभिनेत्री लोकप्रियेतेच्या शिखरावर चढली. चित्रपटातून ही जोडी सर्वाधिक लोकप्रिय ठरली. रश्मिकाचे समाजमाध्यमावर भरपूर चाहते आहेत. या दोघांनीही या चित्रपटातील आपल्या जबरदस्त अभिनयाने लोकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले आहे. आता या चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रदर्शित होणार असून आता 'पुष्पा द रूल' या सिक्वेलचीच सगळीकडे चर्चा आहे. 'पुष्पा'चा सीक्वलही लवकरच येणार असून त्यासाठी निर्मात्यांचीही जोरात तयारी सुरू झाली आहे. 

या चर्चांच्यामध्येच आता अल्लू अर्जुनने आपला एक नवा लुक चाहत्यांसमोर आणला आहे. अल्लूने त्याच्या ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे ज्यात तो एका वेगळ्याच लुकमध्ये दिसतो आहे.  

फोटोमध्ये अल्लू अर्जुन काळ्या लेदर जॅकेटमध्ये सिगारेट धरताना दिसत आहे. त्याच्या फोटोवर टिप्पणी करताना अभिनेत्री रश्मिका मंदान्ना अल्लूला या नवीन रूपात ओळखूच शकली नाही. तिने लिहिले आहे की, ',My god! @alluarjun.. मी तुम्हाला क्षणभरही ओळखू शकलो नाही, सर.' 

अल्लू अर्जुनने सोशल मीडियावर स्वत:चा एक नवीन फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर होताच त्याच्या चाहत्यांनी  #PushpaTheRule हा हॅशटॅग ट्विटरवर शेअर केला आहे. हा हॅशटॅग आता जोरदार ट्रेण्ड व्हायला सुरूवात झाली आहे. अल्लूच्या या फोटोवर चाहत्यांनी भरपूर कमेंट्स केल्या आहेत. एका युझरने लिहिले आहे की, 'अभी तो डबल फायर होगा'

'पुष्पा: द राइज' डिसेंबर 2021 मध्ये रिलीज झाला. सुकुमार यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट आतापर्यंतचा सर्वात मोठा तेलुगू ब्लॉकबस्टर ठरला आहे. अल्लू अर्जुनला या चित्रपटाने देशभरातून प्रसिद्धी मिळवून दिली. 

Read More