Marathi News> मनोरंजन
Advertisement

मराठमोळ्या अभिनेत्याला काम मिळेना? शेअर केली पोस्ट

कोरोनामुळे काम मिळेना 

मराठमोळ्या अभिनेत्याला काम मिळेना? शेअर केली पोस्ट

मुंबई : कोरोना आणि लॉकडाऊनचा सगळ्याच क्षेत्रावर परिणाम झाला आहे. कामाच्या संधी उपलब्ध नसल्याचं दिसून येत आहे. याला मनोरंजन क्षेत्रही अपवाद नाही. अनेक मालिका बंद झाल्या आहेत तर बऱ्याच चित्रपटांची निर्मिती थांबली आहे. एवढंच नव्हे तर अनेक कलाकारांच्या हातातलं काम गेलं आहे. अशी सगळी परिस्थिती असताना एका अभिनेत्याने आपण कामाच्या शोधात असलेली पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. 

अभिनेता आस्ताद काळे (Aastad Kale) याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कामाच्या शोधात असल्याचं म्हटलं आहे. आस्ताद या अगोदर एका वाहिनीवर गाताना दिसला. त्यानंतर आता आपल्याकडे काम नसल्याचं त्याने म्हटलं आहे. 

आस्ताद काळेची पोस्ट 

'नमस्कार, मी सध्या काम (अभिनय/सूत्रसंचालन) शोधतो आहे. माझ्या योग्य भूमिका असल्यास कृपया विचार करावा,अशी पोस्ट आस्तादनं शेअर केली आहे. आस्तादची अशी पोस्ट पाहून चाहत्यांनी मात्र त्याला लवकरच काम मिळेल,असं म्हणत त्याच्या पाठिशी असल्याचं सांगितलं आहे.

नमस्कार. मी सध्या काम (अभिनय/सूत्रसंचालन) शोधतो आहे. माझ्या योग्य भूमिका असल्यास कृपया विचार करावा

Posted by Aastad Sunita Pramod Kale on Tuesday, December 1, 2020

'पुढचं पाऊल' या मालिकेतून आस्ताद घराघरांत पोहोचला होता. त्यानंतर नंतर त्यानं अनेक मालिकांमध्ये काम केलं. आस्तादनं नुकताच ‘सिंगिंग स्टार’ या रिऍलिटी शोमध्ये भाग घेतला होता. या स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत तो पोहोचला होता. 

Read More