Marathi News> मनोरंजन
Advertisement

बिग बींच्या नातीसोबतच्या अफेअरवर अभिनेत्याचं अखेर स्पष्टीकरण

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता मिझान जाफरी आणि नव्या नवेली नंदा यांच्या अफेअरच्या चर्चांनी जोर धरला होता. 

 बिग बींच्या नातीसोबतच्या अफेअरवर अभिनेत्याचं अखेर स्पष्टीकरण

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा सध्या तिच्या रिलेशनशीप स्टेटसमुळे चांगलीच चर्चेत आहे. नव्या नवेली नंदा ही श्वेता बच्चन यांची लेक आहे. नव्याने नुकतीच आपलं ग्रॅज्युऐशन पुर्ण केलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता मिझान जाफरी आणि नव्या नवेली नंदा यांच्या अफेअरच्या चर्चांनी जोर धरला होता. यावर अभिनेत्याने अखेर स्पष्टीकरण दिलं आहे.

अभिनेता जावेद जाफरी यांचा मुलगा मिझाने याने 'मलाल' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. त्याच्या या सिनेमातील भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली.  बिग बींच्या नातीसोबत मिझानचं नाव जोडलं जात असताना त्याने आपण सिंगल असल्याचा खूलासा केला आहे.

fallbacks

मिझानने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपण कुणासोबतही रिलेशनशीपमध्ये नसल्याचं स्पष्ट केलं आहे. नव्या नवेली नंदासोबत माझं नाव का जोडलं जात आहे याबाबत मला देखील कल्पना नाही असं मिझानने यावेळी म्हटलं आहे.

पुढे मिझान म्हणाला, मी सध्या फक्त माझ्या करिअरवर आणि कामावर लक्ष केंद्रीत करत आहे. या केवळ अफवा आहेत.  लोकांना या अफवांवर विश्वास ठेवू नये.

 

 

 

 

 

Read More