Marathi News> मनोरंजन
Advertisement

एssss; असं म्हणताना दिसणाऱ्या या चिमुकल्यानं आज तरुणांना लावलंय वेड, ओळखलं का या अभिनेत्याला?

त्याच्या व्यक्तिमत्त्वाची अनेकांनाच भुरळ, आता तरी नाव लक्षात येतंय का?   

एssss; असं म्हणताना दिसणाऱ्या या चिमुकल्यानं आज तरुणांना लावलंय वेड, ओळखलं का या अभिनेत्याला?

मुंबई : असं म्हणतात की, आपण भविष्यात नेमकं कोणत्या वाटेवर जाऊन करिअर करणार याची सुरुवात बालपणीच झालेली असते. मुद्दा असा की, बाळाचे पाय खरंच पाळण्यात दिसतात असं म्हणण्यात काहीच गैर नाही. सध्या एका मराठी अभिनेत्याची Insta पोस्ट पाहून याचाच प्रत्यय येत आहे. आता हा अभिनेता कोण, हे तुम्ही ओळखायचं आहे. कारण, ही तुमची कसोटीच आहे. 

सध्या हा मराठमोळा अभिनेता त्याच्या Chrming रुपानं सर्वांनाच भुरळ पाडताना दिसत आहे. (Serials and movies) मालिका म्हणू नका किंवा मग चित्रपट, या अभिनेत्यानं कधीच त्याच्या वाट्याला आलेल्या पात्रावरील पकड ढिली पडू दिलेली नाही. त्यानं साकारलेली एखादी भटकंती प्रेमीची भूमिका असो किंवा मग Cool Dude पात्र असो. चाहते त्यातही महिला/ तरुणींच्या नजरा खिळल्या म्हणून समजा. 

तो जिथंजिथं जातो त्या त्या ठिकाणचा होऊन जातो. प्रत्येक ठिकाणी आपली वेगळी छाप सोडून निघतो.  सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या फोटोमध्ये दिसणारा लहानगा म्हणजे तोच हा अभिनेता. आता तुम्ही म्हणाल या दोघांपैकी कोण आणि त्या अभिनेत्याचं नाव काय? हीच तर खरी कसोटी आहे..... बघा जमतंय का. 

नाही जमत? हा चिमुकला आहे अभिनेता ललित प्रभाकर. त्यानं नुकताच इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला जिथं तो कसलंतरी सादरीकरण करताना दिसत आहे. त्याची अभिनयाची ओढ नेमकी किती जुनी हे या फोटोला पाहून लक्षात येत आहे. (Actor lalit prabhakar shares childhood photo many fail to recognize him)

'मी 6 वी आणि 7 वी साठी दोन वर्ष जवाहर नवोदय विद्यालय ला बोर्डिंगमधे होतो. माझं नाटकातलं पहिलं काम मी ह्या शाळेत केलं. घरापासून दूर गेल्यावर आपल्याला आपल्यातलंच काहीतरी नविन नक्की सापडतं…', असं कॅप्शन लिहित त्यानं हा फोटो सर्वांसमोर आणला. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by @lalit.prabhakar

बस्स...  मग काय? ललितच्या या एका फोटोनं धुमाकूळ घातला आणि त्याच्या अभिनयाचं कौतुक करण्यास अनेकांनीच सुरुवात केली. ललितचा फोटो पाहून कमेंट करणाऱ्यांमध्ये इतरही सेलिब्रिटी मागे नव्हते. 

Read More