Marathi News> मनोरंजन
Advertisement

ऐश्वर्यासोबत ऑनस्क्रीन रोमांस, पण नशिबाने साथ दिली नाही,अभिनेता बनला टॅक्सी ड्रायव्हर

90 च्या दशकातील या अभिनेत्याने ऐश्वर्या रायसोबत ऑनस्क्रीन केला होता रोमांस. मात्र, त्यानंतर फ्लॉप होताच इंडस्ट्री सोडून बनला होता टॅक्सी ड्रायव्हर. 

ऐश्वर्यासोबत ऑनस्क्रीन रोमांस, पण नशिबाने साथ दिली नाही,अभिनेता बनला टॅक्सी ड्रायव्हर

Aishwarya Rai Bachchan: बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रचंड यश मिळवलं. यासोबतच त्यांनी अनेक हिट चित्रपट देऊन प्रचंड प्रसिद्धी मिळवली. तर काही असे कलाकार आहेत ज्यांना इंडस्ट्रीमध्ये यश प्राप्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागला. परंतु, तरी देखील त्यांना यश मिळाले नाही. शेवटी त्यांनी अभिनयापासून दूर जाऊन दुसरा मार्ग निवडला. 

असाच एक 90 च्या दशकातील अभिनेता आहे. ज्याने त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात प्रचंड यश प्राप्त केले. मात्र, या अभिनेत्याला ते यश फार काळ टिकवता आले नाही. हा अभिनेता एकेकाळी बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीमध्ये प्रचंड लोकप्रिय होता. परंतु, फ्लॉप चित्रपटांमुळे त्याला अभिनय सोडून टॅक्सी ड्रायव्हर बनला. 

कोण आहे हा अभिनेता? 

हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून तो मिर्झा अब्बास अली आहे. या अभिनेत्याने प्रसिद्ध कलाकारांसोबत काम केलं आहे. ज्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि रजनीकांत यांचा समावेश आहे. अभिनेत्याने 90 च्या दशकात अनेक हिट चित्रपट इंडस्ट्रीला दिले आहे. मिर्झा अब्बासने हिंदी चित्रपटांसह साऊथमध्ये देखील अनेक चित्रपट दिले आहेत. अभिनेत्याने 'अंश:द डेडली पार्ट' या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. त्याचा हा चित्रपट फ्लॉप झाला. त्यावेळी अभिनेत्याने चाहत्यांना हा चित्रपट पाहू नका असा सल्ला देखील दिला होता.

अभिनेत्याने 2000 नंतर सलग फ्लॉप चित्रपट दिले. त्यामुळे करिअर धोक्यात आले. त्यावेळी त्याला कोणीही आधार दिला नाही. त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम करून देखील त्याला चित्रपटांमधून गायब व्हावे लागले. त्यानंतर तो न्यूझीलंडमध्ये दाखल झाला. जिथे गेल्यानंतर त्याने मेकॅनिक आणि टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम केले. कारण त्याला कुटुंबाचे देखील पालनपोषण करायचे होते. 

आर्थिक समस्या वाढल्या

ऐश्वर्या रायसोबत ऑनस्क्रीन रोमांस करणाऱ्या अभिनेत्याने अनेक फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर  त्याला आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागला. एकेकाळी त्याच्याकडे भाडे आणि सिगारेट खरेदी करण्यासाठी देखील पैसे नव्हते. अभिनेत्याची परिस्थिती इतकी वाईट झाली होती की, त्याला पेट्रोल पंपच्या वॉशरुमचा वापर करावा लागत होता. सध्या हा अभिनेता काय करतो याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. 

Read More