Marathi News> मनोरंजन
Advertisement

'तुझ्या डोक्यात हवा गेलीय', म्हणणाऱ्या शरद उपाध्येंना निलेश साबळेने दिलं उत्तर,'तुम्ही गुरुतुल्य... पण'

Nilesh Sable on Sharad Upadhye: डॉ. निलेश साबळेने राशीचक्रकार शरद उपाध्ये यांना 14 मिनिटांचा व्हिडीओ पोस्ट करुन प्रत्युत्तर दिलं आहे. 

'तुझ्या डोक्यात हवा गेलीय', म्हणणाऱ्या शरद उपाध्येंना निलेश साबळेने दिलं उत्तर,'तुम्ही गुरुतुल्य... पण'

Nilesh Sable on Sharad Upadhye: झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय कार्यक्रमाचे दुसरे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण या पर्वात अनेक बदल झाले आहेत. ज्यातील सर्वात मोठा बदल म्हणजे सूत्रसंचलन डॉ. निलेश साबळेच्या ऐवजी अभिनेता अभिजीत खांडकेकर दिसणार आहे. याबाबत सगळीकडेच चर्चा असताना राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी  पोस्ट करुन कार्यक्रमात आपला अपमान केला होता. असे अनेक आरोप केले आहेत. या आरोपांवर निलेश साबळेने तब्बल 14 मिनिटांचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओतून त्याने शरद उपाध्येंना प्रत्युत्तर दिलं आहे. 

निलेश साबळे काय म्हणाला? 

शरद उपाध्येंनी केलेल्या आरोपांवर डॉ. निलेश साबळेने मुद्देसूद उत्तर दिलं आहे. निलेश साबळेने सर्वात अगोदर म्हटलं आहे की, त्याला झी मराठीवरील कार्यक्रमातून डच्चू दिलेला नाही असं त्याने म्हटलं आहे. तसेच शरद उपाध्ये यांनी आपल्या पोस्टमधून 
'चला हवा येऊ द्या' च्या सेटवर अपमान झाल्याचा आणि निलेश साबळेच्या डोक्यात हवा गेल्याचा आरोप केला होता. यावर उत्तर देताना निलेश साबळे म्हणाला, "शरद उपाध्ये सर, खरं तर तुमचा फोन नंबर माझ्याकडे होता आणि माझाही तुमच्याकडे आहे. पण तुम्हाला सोशल मीडियावरच व्यक्त व्हायचं होतं."

त्यामुळे मी देखील सोशल मीडियावर व्यक्त झाल्याच निलेश साबळे म्हणाला आहे. तुम्ही माझ्यासाठी गुरुतुल्य आहात. पण तुम्ही खातरजमा करुन मुद्दा मांडणे अपेक्षित होते. या व्हिडीओत बोलताना निलेश साबळेने अभिनेत्री निर्मिती सावंत यांच्या मुलाच्या लग्नातही आपण भेटल्याचा उल्लेख केला आहे. तब्बल 2 ते अडीच तास गप्पा मारल्या. ही घटना 2017 मधील आहे. तेव्हा तुम्ही 2014 मध्ये घडलेल्या या घटनेचा उल्लेख का केला नाहीत? असा सवालही निलेश साबळेने यावेळी विचारला?

तसेच शरद उपाध्ये यांनी निलेश साबळेचा उल्लेख हा भंगारवाला, अहंकारी, हीन दर्जाचा, सर्वनाश, अधःपतन, खालच्या दर्जाचा अशापद्धतीने उल्लेख केला आहे. यावरही निलेश साबळेने आक्षेप नोंदवला आहे. 

Read More