Marathi News> मनोरंजन
Advertisement

बाळाकडून काय ऐकायला आवडेल? होणाऱ्या मुलाबद्दल रणबीरच्या दिलखुलास गप्पा...

अशी आगळी वेगळी इच्छा रणबीरने बोलून दाखवल्यानंतर सर्वच लोक आश्चर्यचकीत झाले.

 बाळाकडून काय ऐकायला आवडेल? होणाऱ्या मुलाबद्दल रणबीरच्या दिलखुलास गप्पा...

मुंबई -  बॉलिवूड चॉकलेट हिरो रणबीर कपूर सध्या आगामी चित्रपट 'शमशेरा'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. पण तो आपलं पर्सनल लाइफ पण जोडीने सांभाळतो. कारण आपला हा चॉकलेट हिरो वडिल होणार आहे. या चांगल्या बातमीनंतर तो किती आनंदात आहे हे तर कोणापासून ही लपलेलं नाही. शनिवारी रात्री त्याची बायको आलियाला घ्यायला मुंबई विमानतळावर पोहोचला. येवढचं नाही तर तो पत्रकारांशी त्याचा होणाऱ्या मुलाबद्दल आणि पालकत्वावर मनसोक्त गप्पा मारताना दिसतो.

यामध्ये रणबीर कपूरने सांगितले की, ''माझ्या मुलाने माझे आणि आलियाचे सगळे चित्रपट पाहावे आणि त्यावर समिक्षाही करावी.''

अशी आगळी वेगळी इच्छा रणबीरने बोलून दाखवल्यानंतर सर्वच लोक आश्चर्यचकीत झाले.

'ही' गोष्ट मी मुलापासून नाही लपवणार...

पत्रकारांशी बोलता बोलता रणबीरने बाळा विषयी अनेक भावना मांडल्या. तो म्हणतो ''आम्ही जे काही करु त्याचा समाजावर परिणाम होत असतो. त्यामुळे मी कायम सतर्क राहतो. तसंच मी फक्त मनोरंजनासाठी कोणाचाही अपमान होऊ देणार नाही. मी आजपर्यंत जेवढे चित्रपट केले त्या चित्रपटाबद्दल मला कुठलाही पश्चाताप नाही. ना कुठल्याही चित्रपटाची मला लाज वाटते. माझा कुठल्याही सिनेमा असा नाही जो मला माझ्या मुलापासून लपवावा लागेल. तसंच माझ्यासाठी यशासोबतच अपयशही तेवढंच महत्त्वाचं आहे.''

fallbacks


रणबीरला मुलाकडून काय ऐकायला आवडेल?

आपल्या येणाऱ्या मुलाबद्दल रणबीर पत्रकारांशी भरभरून बोलताना दिसला. ''माझ्या मुलाने माझ्या चित्रपटांवर टीका केलेली मला ऐकायला आवडेल. तसंच जेव्हा तो म्हणेल 'पापा तो सिनेमा खराब होता'. तर कुठल्या सिनेमाबद्दल म्हणेल 'पापा तो सिनेमा कॉमेडी होता', आणि त्यावेळी मी देखील त्या क्षणाचा हसून आनंद घेईल.''

'या' चित्रपटात दिसणार

fallbacks


रणबीर आगामी 'शमशेरा' आणि 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात रणबीरसोबत आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि नागार्जुन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आलिया आणि रणबीर पहिल्यांदाच मोठ्या परद्यावर एकत्र दिसणार आहे. या मोस्ट क्यूट कपलला पाहण्यासाठी 9 सप्टेंबरपर्यंतची वाट पाहावी लागणार आहे. तर 'शमशेरा' हा चित्रपट 22 जुलैला रिलीज होणार आहे. या चित्रपटात संजय दत्त आणि वाणी कपूर यांनी काम केलं आहे.

Read More