Actor's Wife Shocking Claims : दाक्षिणात्य अभिनेता रवी मोहननं सपटेंबर 2024 मध्ये सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत पत्नी आरतीसोबत विभक्त होणार असल्याची घोषणा केली. पण त्याच्या या निर्णयानं सगळ्या चाहत्यांना धक्का बसला होता. कारण त्यांनी या गोष्टीचा अंदाज बांधला नव्हता. आता रवी मोहन हा त्याची कथित गर्लफ्रेंड केनिशा फ्रान्सिससोबत एका लग्नात पोहोचला. सगळ्यात लक्षवेधी गोष्ट म्हणजे जेव्हा रवी मोहननं विभक्त होण्याची घोषणा केली त्यावेळीच रवी आणि केनिशाच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु होत्या. पण केनिशानं या सगळ्या अफवा असल्याचं म्हटलं. आता त्याची पत्नी आरतीनं त्यांच्या घटस्फोटाच्याविषयी बोलताना हा दावा केला की तिला घरातून बेदखल केलं असून तिच मुलांची काळजी घेत आहे.
रवी मोहनची पत्नी आरतीनं काल 9 मे रोजी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिनं म्हटलं की मी एक वर्षापासून शांत होते. त्यामुळे नाही की मी काही करू शकत नाही म्हणून नाही तर यासाठी की मी जितकं ऐकू शकत होते त्यापेक्षा जास्त माझ्या मुलांना शांतीची गरज होती. मी प्रत्येक प्रकारे आरोप-प्रत्यारोप आणि माझ्या विषयी बोलल्या जाणाऱ्या सगळ्या गोष्टी शांतपणे ऐकून घेतल्या. त्यावेळी मी काही बोलले नाही. हेच कारण होतं की मी खरं बोलू शकत नव्हते. तर यासाठी की माझ्या मुलांना आई-वडिलांमधून एकाला निवडावं लागेल.
आरतीनं पुढे सांगितलं की आजकाल जग तेच पाहतं जे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. खरंतर सत्य हे वेगळंच असतं. माझा घटस्फोट अजून प्रोसेसमध्ये आहे. पण ज्या व्यक्तीसोबत मी 18 वर्ष प्रेम, प्रामाणिकपणे आणि विश्वासानं साथ देत राहिली, ती व्यक्ती फक्त माझ्यापासून लांब गेली नाही तर त्यानं सगळ्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष केलं. त्या सगळ्या गोष्टींचा सन्मान करण्याचा त्यानं कधी वचन दिलं होतं.
आरतीनं पुढे दावा केला की अनेक महिने तिनं एकटीनं सगळं थांबलं. तिनं सांगितलं की प्रत्येक घटनेला ती स्वत: सांभाळत होती. तिला आता घरातून देखील बेदखल करण्यात आलं आहे कारण तिला बॅंकतून नोटिस मिळते. तिनं सांगितलं की तिला गोल्ड डिगर देखील म्हटलं जात आहे. तिनं सांगितलं की जर असं झालं असतं तर तिनं स्वत: साठी खूप काही केलं असतं. पण तिनं प्रेम आणि विश्वासाला निवडलं होतं.
हेही वाचा : बॉलिवूडची एकमेव अभिनेत्री जिच्या नावे आहे Island; प्रियांका, दीपिका, आलिया नाही तर 'ही' आहे अभिनेत्री
आरतीनं पुढे सांगितलं की तिला आता प्रेम करण्यावरून पश्चाताप होतोय. पण आता ती शांत बसणार नाही. माझी मुलं 10 आणि 14 वर्षांचे आहेत. त्यांना धक्का नाही तर त्यांना सुरक्षेची गरज आहे. ते लीगल क्लॉज समजून घेण्यासाठी खूप लहाण आहेत. पण त्यांना हे कळतंय की त्यांना सोडलं आहे. फोन केल्यानंतर त्याला उत्तर न देणं, भेटण्याचं ठरलेलं असताना ते अचानक कॅन्सल करणं. मेसेजचं उत्तर देखील काही खास नाही. मुलांनी सगळं काही वाचलं आहे आणि हे त्यांच्यासाठी खूप धक्कादायक आहे. त्यांच्या मनावर लागलेली एक जखम आहे.