Marathi News> मनोरंजन
Advertisement

सलमाननं अभिनेत्रीला दिली खुली ऑफर...अखेर 'या' गोष्टीवर भाळला 'दबंग'

'कभी ईद,कभी दिवाळी' या सिनेमातील अभिनेत्रीला सलमान खानने खुली ऑफर दिलीय.

सलमाननं अभिनेत्रीला दिली खुली ऑफर...अखेर 'या' गोष्टीवर भाळला 'दबंग'

मुंबईः सलमान खानचा 'कभी ईद कभी दिवाळी' हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. सलमाननेही या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे, तर आता बातम्या येत आहेत की 'बिग बॉस 13' फेम शहनाज गिल या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पहिले पाऊल ठेवणार आहे.

fallbacks

ही बातमी ऐकल्यानंतर शहनाजचे चाहते खूप उत्साहित आहेत. या चित्रपटातून शहनाज गिलला सलमान खानसोबत काम करण्याची मोठी संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात काम करण्यासाठी सलमान खान शहनाजला मागेल ती किंमत द्यायला तयार आहे.

रिपोर्ट्सनुसार, सलमान खानने शहनाज गिलला स्वतःची फी निवडण्याची संधी दिली आहे.  

fallbacks

एका सूत्राने सांगितले की, "शहनाज गिलची स्टाइल आणि लूक पाहून सलमान खानने तिला या चित्रपटासाठी स्वतःची फी निवडण्याची संधी दिली आहे." सलमान खान शहनाजच्या निरागसतेचा चाहता झाला आहे, त्यामुळे तो शहनाजला त्याची फी निवडण्याची खुली ऑफर देत आहे

fallbacks

'कभी ईद कभी दिवाळी' या चित्रपटात शहनाज गिलची भूमिका काय असेल, याचा खुलासा अद्याप झालेला नाही. पण, रिपोर्टनुसार शहनाज सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मासोबत दिसणार आहे.

अलीकडेच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये शहनाज व्हॅनिटी व्हॅनमधून बाहेर पडताना दिसत होती आणि त्यानंतर चाहत्यांनी असा अंदाज लावला की शहनाजने नक्कीच चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे.

Read More