Marathi News> मनोरंजन
Advertisement

बिश्नोईच्या माणसांना सलमानची भीती? गोळीबार करणाऱ्यांचा वकील रडला, गंभीर आरोप!

Salman Khan House Firing Case: बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात नवा ट्विस्ट आला असून सलमानला खूप कडक भूमिका घ्यावी लागली आहे. काय आहे प्रकरण? जाणून घ्या सविस्तर

बिश्नोईच्या माणसांना सलमानची भीती? गोळीबार करणाऱ्यांचा वकील रडला, गंभीर आरोप!

Salman Khan House Firing Case: अभिनेता सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. अशातच या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. यामध्ये सलमान खानबद्दल असे बोलले जात होते की, सलमान खान तुरुंगात असलेल्या आरोपीचा खून करू शकतो. मात्र, आता सलमान खानने हे बोलणाऱ्या आरोपीच्या वकिलाला मानहानीची नोटीस पाठवली आहे. नोटीस मिळाल्यानंतर वकील रडायला लागले. 

अमित मिश्रा यांची अवस्था वाईट

दैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार, आरोपी विकी गुप्ता आणि सागर पालच्या कुटुंबियांना भीती आहे की दाऊद इब्राहिमचे गुंड सलमान खानच्या सांगण्यावरून त्यांची हत्या करतील. हे सर्व सांगून मी फक्त माझ्या क्लायंटचा मुद्दा मांडला आहे. मी एक वकील आहे. मी माझे काम करत आहे. त्यामुळे मी यात माझ्या बाजूने काहीही बोललो नाही. 

मी काहीही केलेले नाही. तरी देखील मला घाबरवण्यासाठी आणि माझ्यावर दबाव आणण्यासाठी बदनामीची नोटीस पाठवण्यात आली आहे. मी एक वकील आहे. पण आता मी पीडित झालोय असं वाटतंय. पण माझ्याकडून काही चुकलं तर त्याला सलमान खान जबाबदार असेल. सलमान खानने मला कायदेशीर नोटीस पाठवून 48 तासांमध्ये माफी मागायला सांगितली आहे. 

fallbacks

अमित मिश्रा नेमकं काय म्हणाले? 

मी माफी न मागितल्यास माझ्यावर गुन्हा दाखल केला जाईल आणि मला आर्थिक दंडही भरावा लागेल. असं या नोटीसमध्ये लिहिले आहे. मला कोणत्या आधारावर नोटीस पाठवण्यात आली आहे. हे मला माहिती नाही. या प्रकरणात मी काय गुन्हा केला आहे. अमित मिश्रा यांचे म्हणणे आहे की, या प्रकरणात मला अडकवण्याचा डाव आहे. त्यामुळे तो कंटाळला आहे. तो केस सोडून जात आहे. यावेळी अमित मिश्रा खूप रडत होता. त्याचबरोबर तो खूप घाबरलेला दिसत होता. 

एका महिन्याची मुदत 

अमित मिश्राच्या या वक्तव्यावर आता डीएसके लीगल फर्मशी संबंधित वकील पराग यांचेही वक्तव्य समोर आले आहे. त्यांनी म्हटले आहे की, अमितच्या या निर्णयामुळे आमचे क्लायंटचे नाव खराब करण्याचा प्रयत्न केला आहे. ते त्यांच्या पक्षाच्या वतीने बोलले आहेत. ते असे बोलून सुटू शकत नाहीत. त्यांना उत्तर द्यावे लागेल. मात्र, त्यांनी उत्तर देण्यासाठी एक महिन्याची मुदत मागितली आहे. 

Read More