Marathi News> मनोरंजन
Advertisement

'हिरोईनच्या पोटाला चिमटे काढले असते तर...' पुरुषार्थाविषयी असं का म्हणाला अदिती राव हैदरीचा पती?

Entertainment News : रुपेरी पडद्यावर 'हिरो' साकारला जात असताना तो नेमका कसा दाखवला जातो? चित्रपटांमधील पुरुष पात्रांविषयी असं काय म्हणाला सिद्धार्थ, ज्याची होतेय इतकी चर्चा   

'हिरोईनच्या पोटाला चिमटे काढले असते तर...' पुरुषार्थाविषयी असं का म्हणाला अदिती राव हैदरीचा पती?

Entertainment News : सिनेजगातमध्ये काही कलाकार, काही सेलिब्रिटी असेही आहेत ज्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये फार मोठ्या संख्येनं चित्रपटांमध्ये काम केलं नाही, कोणत्या रिअॅलिटी शो चा ते भागही झाले नाहीत. पण, वाट्याला आलेल्या निवडक भूमिका त्यांनी इतक्या ताकदीनं साकारल्या, की त्यांच्या लोकप्रियतेच्या आड काहीच येऊ शकलेलं नाही. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थ. 

दक्षिणेकडील सिनेसृष्टीमध्ये आपल्या दमदार अभिनयाच्या बळावर आणि दर्जेदार भूमिकांच्या बळावर प्रसिद्धीझोतात आलेल्या सिद्धार्थनं कायमच आपले काही मुद्दे अगदी स्पष्टपणे मांडले आहेत. यावेळी सिद्धार्थनं हैदराबादमधील एका साहित्य संमेलनादरम्यान कलाविश्वातील आणि विशेष म्हणजे चित्रपट सृष्टीतील अनेक गोष्टींवर वक्तव्य केलं. चर्चेचा मुख्य विषय ठरला तो म्हणजे घातक पुरुषार्थाचं उदात्तीकरण. 

बनावट आणि तितक्याच घातक पुरुषार्थाविषयी काय म्हणाला सिद्धार्थ? 

'मला कायमच अशा स्क्रीप्ट मिळत होत्या ज्यामध्ये महिलांना कानशिलात लगावणं, आयटम साँग करणं, हिरोईनच्या पोटाला चिमटा काढणं अशा गोष्टी करणं अपेक्षित असायचं. एखादं दृश्य असं असे जिथं महिलेनं काय करावं, तिनं कुठं जावं हे मी सांगणं अपेक्षित असायचं. मी अगदी स्पष्टपणे अशा भूमिका नाकारल्या. मी अशा भूमिका साकारल्या असत्या तर हमखास मी एक मोठा कलाकार असतो', असं सिद्धार्थ म्हणाला. 

अशा भूमिका नाकारण्यामागचं कारण सांगताना मी अतिशय विचित्र आहे, मला जे आवडतं, जे भावतं ते करतो असं सांगत आपण साकारलेल्या विविध पात्रांचा प्रेक्षकांवरही परिणाम झाला आहे हा मुद्दा त्यानं अधोरेखित केला. महिला, मुलं आणि पालकांचा मुद्दा जिथं येतो तिथं आपले 15 वर्षांपूर्वीचे चित्रपट प्रेक्षक आजही पाहू शकतात यातच आपल्याला दिलासा वाटतो असंही सिद्धार्थनं या संमेलनादरम्यान सांगितलं. 

हेसुद्धा वाचा : 'परिस्थिती कशीही असो...' म्हणत अभिनेत्यानं पत्नीच्या नावे केली सगळी 22,50,90,10,108 रुपयांची संपत्ती 

आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांवर चांगला प्रभाव पाडला असं म्हणत यातच आपण समाधानी असल्याची प्रतिक्रिया सिद्धार्थनं दिली. जवळपास मागील 20 वर्षांपासून कलाविश्वामध्ये अभिनय क्षेत्रात योगदाना देणारा हा अभिनेता त्याच्या याच वेगळेपणासाठी आजही तितकाच लोकप्रिय असल्याचं म्हटलं जातं. 

Read More