Marathi News> मनोरंजन
Advertisement

अभिनेता Sonu sood या संपूर्ण गावाला पुरवणार राशन, म्हणाला माझे आई-वडील नाहीत पण...

एका रिअॅलिटी शो दरम्यान अभिनेता सोनू सूद भावूक झाला. या दरम्यान स्पर्धकांनी सोनू सूदला ट्रिब्युट म्हणून एका परफॉर्मेंस केला.

अभिनेता Sonu sood या संपूर्ण गावाला पुरवणार राशन, म्हणाला माझे आई-वडील नाहीत पण...

मुंबई : एका रिअॅलिटी शो दरम्यान अभिनेता सोनू सूद भावूक झाला. या दरम्यान स्पर्धकांनी सोनू सूदला ट्रिब्युट म्हणून एका परफॉर्मेंस केला. जो पाहून सोनू सूदला अश्रृ अनावर झाले. या वेळी सोनू सूद म्हणाला की, 'माझे आई-वडील नाहीत, परंतु कुठेतरी ते वरुन बघत असतील आणि माझ्यासाठी प्रार्थना करीत असतील. आज माझं कुटुंब इतकं मोठं बनलं आहे.'.

लॉकडाऊननंतर सोनू सूद गरजुंच्या मदतीसाठी पुढे आला. त्याने स्वत: लोकांना मदत केली. इतकंच नाही तर तो आज वेगवेगळ्या माध्यमातून लोकांना मदत करत आहे, सोनू सूद आज संपूर्ण जगात तो करत असलेल्या सेवेमुळे ओळखला जावू लागला आहे. तो रिअल हिरो ठरला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ColorsTV (@colorstv)

स्पर्धकाच्या संपूर्ण गावाला रेशन देण्याचे वचन

या शोमध्ये एका स्पर्धकाने म्हटलं की, 'लॉकडाउननंतर आमच्या गावातील लोकं घाबरले आहेत. त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न तयार झाला आहे.' हे ऐकून सोनू सूद म्हणला की, 'जोपर्यंत लॉकडाउन आहे. तोपर्यंत तोपर्यंत माझ्या वतीने तुमच्या संपूर्ण गावात रेशन पोहोचत राहील'.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ColorsTV (@colorstv)

Read More