Tushar Dalvi Birthday: मराठी आणि हिंदी सृष्टीतील लोकप्रिय अभिनेते तुषार दळवी यांनी नुकताच त्यांचा 58 वा वाढदिवस साजरा केला आहे. अभिनयाच्या क्षेत्रात आपल्या वेगळ्या आणि नेमक्या शैलीमुळे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे तुषार दळवी यांनी आजही त्यांचा प्रवास यशस्वीरित्या सुरू ठेवला आहे.
तुषार दळवी यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात कॉलेजमध्ये असतानाच नाट्यप्रयोग आणि एकांकिकांमधून केली होती. अभिनयातील त्यांची ही आवड हळूहळू व्यावसायिक रंगभूमीकडे वळली आणि त्यानंतर त्यांनी 1992 मध्ये 'जिवलगा' या मराठी चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. या चित्रपटात त्यांनी ग्रामीण भागातील तरुणाची भूमिका साकारली होती. जी प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली.
त्यानंतर तुषार दळवी यांनी मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपला दमदार अभिनय दाखवत अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये त्यांनी काम केलं. 'मेरे साई' या मालिकेतून त्यांनी हिंदी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत एक विशेष ओळख निर्माण केली आहे. या मालिकेत त्यांनी साईबाबांची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर आपली एक विशेष छाप सोडली. या भूमिकेमुळे त्यांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आणि त्यानंतर ते पुन्हा मराठी मालिकांकडे वळले.
'भाग्य दिले तू मला' या कलर्स मराठीवरील मालिकेत त्यांनी एका महत्त्वपूर्ण भूमिकेतून पुनरागमन केलं. सध्या ते झी मराठीवरील 'लक्ष्मी निवास' या मालिकेत 'श्रीनिवास' ही भूमिका साकारत आहेत. त्यांच्या संयमी आणि समंजस अभिनयामुळे ही भूमिका विशेष गाजत आहे.
तुषार दळवी यांच्या पत्नी काय करतात?
तुषार दळवी यांच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर तुषार दळवी यांची पत्नी मालविका दळवी या चार्टर्ड अकाउंटंट आहेत. आपला कौटुंबिक आणि व्यावसायिक जीवन यशस्वीपणे सांभाळत तुषार दळवी यांनी अभिनय क्षेत्रात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
तुषार दळवी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप शुभेच्छा! त्यांनी अजूनही अशाच यशस्वी भूमिका साकाराव्यात आणि प्रेक्षकांची मन जिंकत राहावं, हीच अपेक्षा. अशा शुभेच्छा काही कलाकारांनी त्यांना दिल्या आहेत.
FAQ
तुषार दळवी यांनी कोणत्या मालिकेत साईबाबांची भूमिका साकारली?
तुषार दळवी यांनी कोणत्या मालिकेतून मराठीत पुनरागमन केलं?
सध्या तुषार दळवी कोणत्या मालिकेत काम करत आहेत?