Marathi News> मनोरंजन
Advertisement

अभिनेता ज्यानं वर्षभरात 36 चित्रपटांमध्ये काम करत बनवला रेकॉर्ड; मुलाला लागली 13 वर्षे; नेटवर्थ तब्बल 3400000000

Actor who worked in 36 films in a year : अभिनेता ज्यांनं एका वर्षात 36 चित्रपट करत बनवला रेकॉर्ड

अभिनेता ज्यानं वर्षभरात 36 चित्रपटांमध्ये काम करत बनवला रेकॉर्ड; मुलाला लागली 13 वर्षे; नेटवर्थ तब्बल 3400000000

Actor Mammootty : आजकाल अनेक लोकं चित्रपट बनवताना त्यात स्पेशल इफेक्ट आणि अशा बऱ्याच गोष्टी टाकून ते लवकर संपवतात. जेणे करून त्यांना दुसऱ्या प्रोजेक्टवर लक्ष केंद्रित करता येईल. तर काही कलाकार असतात जे स्पेशल इफेक्ट्सचा वापर करण्यास सांगतात जेणे करून त्यांना देखील दुसरा प्रोजेक्ट लवकर करता येईल. पण एक अभिनेता असा होता ज्यानं एका वर्षात सगळ्यात जास्त चित्रपट करण्याचा रेकॉर्ड बनवला आहे. आता हा अभिनेता कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तो अभिनेता ममूटी आहे. 

ममूटी यांनी 1971 मध्ये 'अनुभवंगल पालीचाकल' या चित्रपटात एक छोटीशी भूमिका करत अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यांचा पहिला महत्त्वाची भूमिका असलेला चित्रपट म्हणजे 1980 साली प्रदर्शित झालेला 'मेला' हा चित्रपट. ममूटी हे मल्याळम चित्रपटसृष्टीचे सगळ्यात मोठ्या कलाकारांपैकी एक आहेत. 

ममूटी यांनी एकामागे एक असे अनेक चित्रपट केले पण 1982 मध्ये त्यांनी एका वर्षात तब्बल 24 चित्रपटांमध्ये काम केलं. तर 1983 ते 1986 या काळात त्यांनी दरवर्षी जवळपास 36, 34, 28 आणि 35 चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांनी केलेल्या या मेहनतीनंतर त्यांना इंडस्ट्रीतली सगळ्यात मेहनती अभिनेत्यांपैकी एक अशी ओळख मिळाली. ममूटी यांनी 400 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं. 1983 मध्ये त्यांनी एका वर्षात त्यांनी 36 चित्रपटांमध्ये काम केलं. तर त्यांचा मुलगा दुलकर सलमानला इतक्या चित्रपटांमध्ये काम करायला तब्बल 13 वर्षांचा काळ लागला. 

हेही वाचा : 60 कोटींची हवेली, इटलीत 40 कोटींचा व्हिला अन् 24 कोटींच्या फार्महाउसचा मालक; 'या' अभिनेत्याला ओळखलं का?

ममूटी यांचा 1983 मध्ये आलेला त्यांचा ‘आ रात्री’ हा चित्रपट 1 कोटी रुपये कमावणारा पहिल्या मल्याळम चित्रपटांपैकी एक ठरला. ‘कूडेविडे’ आणि ‘अडियोझुक्ककल’ यासारख्या हिट चित्रपटांमुळे ते किती चांगला अभिनय करतात हे प्रेक्षकांसमोर आलं. त्यांनी आय.व्ही. ससी आणि एम.टी. वासुदेवन नायर यांच्यासारख्या दिग्गज दिग्दर्शकांसोबतही काम केलं.

ममूटी यांची एकूण नेटवर्थ

ममूटी यांच्या नेटवर्थविषयी बोलायचं झालं तर ती एकूण 340 कोटी एकूण नेटवर्थ आहे. 

Read More