Marathi News> मनोरंजन
Advertisement

१५० हून अधिक सिनेमात 'याचे' रेप सीन, त्यातील पाहिले फक्त १० सिनेमा

७० ते ८० च्या दशकात झालेल्या सिनेमातील बहुतांश रेप सीनसाठी रंजित यांनाच कास्ट केले जायचे. त्यामुळे रेपिस्ट कलाकार अशीच त्यांची ओळख बनली होती. 

१५० हून अधिक सिनेमात 'याचे' रेप सीन, त्यातील पाहिले फक्त १० सिनेमा

मुंबई : खलनायकाची भुमिका साकारणाऱ्या नटा बद्दल अनेकांच्या मनात दुराग्रह असतात. ते खाजगी आयुष्यामध्येही इतक्रेच क्रूर, निर्दयी असावेत असा समज केला जातो.

पण काही खलनायक याला नक्कीच अपवाद ठरतात. अभिनेता रंजित हे त्यापैकीच एक नाव. 
  
७० ते ८० च्या दशकात झालेल्या सिनेमातील बहुतांश रेप सिनसाठी रंजित यांनाच कास्ट केले जायचे. त्यामुळे रेपिस्ट कलाकार अशीच त्यांची ओळख बनली होती. 
  

नो नॉनवेज, नो ड्रिंक्स  

त्यांनी आतापर्यंत कधी नॉन व्हेज खाल्ले नाही तसेच दारूला स्पर्शही न केल्याचे नुकतेच रंजित यांनी सांगितले.  टीव्ही शो 'एंटरटेनमेंट की रात' या व्हिलन स्पेशल एपिसोडमध्ये ते बोलत होते.

यावेळी त्यांच्यासोबत अभिनेता शक्ती कपूरदेखील होते. 

१५० चित्रपटात रेप सीन

 रंजित यांनी आतारक्यंत १५० चित्रपटातून रेप सीन केले. पण त्यातील फक्त १० चित्रपटच त्यांनी पाहिल्याचा खुलासा त्यांनी यावेळी केला. त्यांच्या फिटनेसबद्दल यावेळी विचारण्यात आले. 

'मी कधीही जीममध्ये गेलो नाही. आमच्या काळात आजच्या सारखी जीमची क्रेझ नव्हती. पण व्यसनांच्या मागे कधी लागलो नाही, असे त्यांनी सांगितले. 

Read More