Marathi News> मनोरंजन
Advertisement

लॉकडाऊनमध्ये जडला जीव, अभिनेत्रीनं केलं बॉडीगार्डसोबत लग्न

लॉकडाऊनमध्ये दोघांचं एकमेकांवर प्रेम जडलं आणि त्याची लवस्टोरी सुरू झाली. तर दुसरीकडे या अभिनेत्रीनं सोशल मीडियाला बायबाय करणार असल्याचं सांगितलं आहे.

लॉकडाऊनमध्ये जडला जीव, अभिनेत्रीनं केलं बॉडीगार्डसोबत लग्न

मुंबई: हॉलिवूड अभिनेत्री आणि प्रसिद्ध मॉडेल पामेला अॅण्डरसनने पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली आहे. 12 दिवसांत नवऱ्यासोबत काडीमोड घेऊन पुन्हा 6व्यांदा लग्न केलं. यावेळी पामेलानं बॉडीगार्डसोबत लग्नगाठ बांधल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. पामेलानं तिचा बॉडीगाडी डॅन हेहर्स्टसोबत विवाह केला. या विवाहानंतर ती सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. याआधी 5 वेळा पामेलानं लग्न करून काडीमोड घेतला होता.

'माझ्या आजोबांनी 25 वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या मालमत्तेवर मी लग्न केलं. माझ्या आई-वडिलांनी देखील इथेच लग्नगाठ बांधली आणि आजही ते एकत्र आहेत. मी त्याची पुनरावृत्ती करत असल्याचं मला वाटत आहे. पामेला अॅण्डरसन पुन्हा एकदा तिच्या लग्नामुळे चर्चेत आली आहे.

पामेलाची प्यार वाली लवस्टोरी डेली मेलनं दिलेल्या वृत्तानुसार पामेलाचं तिच्या बॉडीगार्डवर प्रेम जडलं. कोरोना व्हायरसच्या काळात लॉकडाऊनमध्ये डॅनसोबत प्रेमकहाणी सुरू झाली. पामेलानं मागच्याच वर्षी क्रिसमस ईव इथे विवाह केल्यानं ती चर्चेत होती. तर तीने एका पतीपासून अवघ्या 12 दिवसांत तलाक घेतला होता.

पामेलाला आहेत 5 पती पामेलानं सहाव्यांदा विवाह केल्यानं खूप चर्चेत आली आहे. मागच्या वर्षी जानेवारी महिन्यात हॉलिवूड प्रोड्युसरसोबत पामेलानं लग्न केलं होतं. पामेला आणि जॉन यांचं लग्न 12 दिवसच टीकू शकलं. अवघ्या 12 दिवसांत त्यांनी घटस्फोट घेतला. त्याआधी रॉकर्स टॉमी ली, किड रॉक यांच्यासोबतही विवाह झाला होता.

त्यांनी दोन वेळा प्रोफेशनल पोकर रिक सॉलोमॉनसोबत विवाह केला होता. आता बॉडीगार्डशी लग्न केल्यानं पुन्हा एकदा चर्चा होत आहे.

सोशल मीडियाला केलं गुडबाय!

या आठवड्यात पामेला सोशल मीडियाला गुडबाय करणार आहे. ती कायमचं सोशल मीडियावरील आपलं अकाऊंड बंद करणार असल्याचं तिने सांगितलं. पामोला बिग बॉस 4 मधील स्पर्धेक देखील होती. वयाच्या 53व्या वर्षी तिने बॉडीगार्डसोबत लग्न केल्यानं पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Read More