Marathi News> मनोरंजन
Advertisement

जवळच्या माणसानेच आलिया भट्टला घातला 77 लाखांचा गंडा; पाच महिन्यांनी सापडला खरा आरोपी

Alia Bhatt PA: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टला 77 लाखांचा गंडा घालणाऱ्या जवळच्या व्यक्तीला अखेर पोलिसांकडून अटक.

जवळच्या माणसानेच आलिया भट्टला घातला 77 लाखांचा गंडा; पाच महिन्यांनी सापडला खरा आरोपी

Alia Bhatt PA Fraud Case: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिच्या प्रॉडक्शन हाऊस, इटरनल सनशाइन प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेड आणि तिच्या वैयक्तिक खात्यांमधून 76,90,892 रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असणाऱ्या सुपरस्टार आलिया भट्टची माजी वैयक्तिक सहाय्यक वेदिका प्रकाश शेट्टी हिला पोलिसांनी अटक केली आहे.

वेदिका प्रकाश शेट्टीला बंगळुरूमध्ये अटक करण्यात आली आहे. तिला पाच दिवसांच्या ट्रान्झिट रिमांडवर मुंबईत आणण्यात आले आहे. वेदिका शेट्टीला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. मे 2022 ते ऑगस्ट 2024 दरम्यान दोन वर्षांच्या कालावधीत ही फसवणूक करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

पाच महिन्यांपासून सुरु होता पाठलागा 

आलिया भट्टची आई आणि इटरनल सनशाइन प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक सोनी राजदान यांनी 23 जानेवारी रोजी मुंबईतील जुहू पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यावेळी हे संपूर्ण प्रकरण समोर आले होते. तक्रारीनुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहिताच्या कलम 316(4) (गुन्हेगारी विश्वासघात) आणि 318(4) (फसवणूक) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  मरोळ येथील एनजी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी रोड येथील रहिवासी वेदिका प्रकाश शेट्टीने कंपनी आणि बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टची मोठी फसवणूक केली. वेदिका ही आलियाची सचिव असल्यामुळे तिच्यावर महत्त्वपूर्ण आर्थिक जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या होत्या. ज्याचा फायदा घेत तिने फसवणूक केली असल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. 

पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वेदिका शेट्टी 2021 मध्ये आलिया भट्टचा वैयक्तिक सचिव म्हणून काम करत होती. त्यापूर्वी ती दुसऱ्या अभिनेत्याची वैयक्तिक सचिव म्हणून काम करत होती. 2021 पासून वेदिका शेट्टी 2024 पर्यंत ही आलिया भट्टची सचिव म्हणून काम करत होती. अशातच वेदिका शेट्टीने बनावट पावत्या तयार करून त्यावर आलिया भट्टची स्वाक्षरी घ्यायची. वेदिका आलिया भट्टला सांगायची की ही पावत्या अभिनेत्याच्या प्रवास, मेळावा आणि बैठकींदरम्यान झालेल्या विविध खर्चासाठी असल्याचं सांगायची अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

पोलिस अधिकाऱ्यांनी म्हणाले की, आलियाने वेदिकावर विश्वास ठेवला आणि म्हणून तिने पडताळणी न करता स्वाक्षरी केली. सूत्रांनी सांगितले की शेट्टी ऑनलाइन इमेजिंग अॅप्स वापरून इनव्हॉइसेस प्रिंट करण्यापूर्वी खरे दिसतील याची खात्री करण्यासाठी खूप प्रयत्न करत असे. आलियाने इनव्हॉइसवर स्वाक्षरी केल्यानंतर वेदिकाने संबंधित पेमेंट तिच्या जवळच्या मैत्रिणीला पाठवले. 

त्यानंतर ही मैत्रीण संपूर्ण जमा केलेली रक्कम वेदिकाच्या खात्यात परत ट्रान्सफर करत असे. त्यानंतर ती सतत तिचे ठिकाण बदलत असायची. राजस्थान नंतर कर्नाटकच्या अंतर्गत भागात, त्यानंतर पुणे आणि नंतर बेंगळुरूला जात असे. मात्र, तिला अखेर जुहू पोलिसांनी अटक केली आहे.  तिला 10 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे.

Read More