Marathi News> मनोरंजन
Advertisement

धक्कादायक! Taliban मुळे अभिनेत्रीचं क्रिकेटरशी लग्न मोडण्याची शक्यता

अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर याचे थेट पडसाद दिसण्यास सुरुवात झाली. 

धक्कादायक! Taliban मुळे अभिनेत्रीचं क्रिकेटरशी लग्न मोडण्याची शक्यता

नवी दिल्ली : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानची सत्ता आल्यानंतर याचे थेट पडसाद दिसण्यास सुरुवात झाली. विविध कारणांनी तालिबान राजचे पडसाद उमटू लागले त्यातच आता आणखी एका घटनेची भर पडली आहे. जिथं एका अभिनेत्रीचा संसार थाटण्यापूर्वीच मोडण्याची चिन्हं आहेत. 

अफगाणिस्तानमधील सत्तासंघर्ष सुरु असतानाच अभिनेत्री अर्शी खान हिनं आपलं या देशाशी असणारं नातं सर्वांसमोर आणलं. इतकंच नव्हे, तर आपला साखरपुडा एका अफगाणी क्रिकेटरशी होणार होता, पण आता मात्र ही सर्व नाती तोडण्याचा विचार ती करत असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. 

अफगाणी क्रिकेटरशी होणार होता साखरपुडा... 
अर्शी खानच्या म्हणण्यानुसार ऑक्टोबर महिन्यात तिचा साखरपुडा एका अफगाणी क्रिकेटपटूशी होणार होता. तिच्या सांगण्यानुसार तिच्या वडिलांनीच या खेळाडूला तिच्यासाठी पसंत केलं होतं. पण, अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा (Taliban) कब्जा झाल्यामुळे आता हे नातं सुरु होण्यापूर्वीच तोडावं लागण्याची शक्यता आहे. 

आपण त्या खेळाडूशी संवाद साधत असून, तो वडिलांच्याच मित्राचा मुलगा होता. ती या साऱ्यामुळे आनंदातही होती, पण आता मात्र एखाद्या भारतीय वराचाच शोध घेण्याची गरज असल्याचं अर्शी म्हणाल्याचं कळत आहे.

fallbacks

अफगाणिस्तानशी नेमकं नातं काय ? 
अर्शी खाननं सांगितल्यानुसार तिच्या कुटुंबाचं मूळ अफगाणिस्तानात असून, ती एका अफगाणी युसूफ जहीर पठाम कुटुंबातील मुलगी आहे. तिचे आजोबा अफगाणिस्तानातून आले असून, ते भोपाळमध्ये जेलर होते. आपल्या कुटुंबाचं मूळ अफगाणिस्तानातील असलं तरीही आपण मात्र भारतीय असल्याचं अर्शी सांगते. 

Read More