Marathi News> मनोरंजन
Advertisement

व्यावसायिक पतीसोबत लग्न करण्यासाठी 'या' अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, 1300 कोटी बँक बॅलन्स आणि 12000 कोटींची उलाढाल

Actress Asin Husband: बॉलिवूडमधील या अभिनेत्रीने करिअरच्या शिखरावर असताना इंडस्ट्रीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आणि 1300 कोटी बॅक बॅलन्स 12000 कोटींची उलाढाल असणाऱ्या उद्योजकासोबत लग्न केलं. 

व्यावसायिक पतीसोबत लग्न करण्यासाठी 'या' अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, 1300 कोटी बँक बॅलन्स आणि 12000 कोटींची उलाढाल

Bollywood Actress Asin Husband: बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी करिअरच्या शिखरावर असताना लग्न केलं. त्यानंतर त्यांनी इंडस्ट्रीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. अशीतच एक अभिनेत्री जिने  ‘गजनी’, ‘हाऊसफुल 2’ आणि ‘रेड’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती अभिनेत्री असीन आहे. असीनने एकेकाळी बॉलिवूडमध्ये जबरदस्त अभिनय करून प्रचंड यश प्राप्त केलं होतं. 

दरम्यान, बॉलिवूडमध्ये तिने अभिनयाच्या जोरावर तिने प्रचंड लोकप्रियता मिळवली. मात्र, 2016 मध्ये असीनने अचानक सिनेसृष्टीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. 1300 कोटी बँक बॅलन्स आणि 12000 कोटी रुपयांची उलाढाल असणाऱ्या मायक्रोमॅक्स या भारतीय स्मार्टफोन कंपनीचे सह-संस्थापक राहुल शर्मा यांच्यासोबत लग्न केलं आणि इंडस्ट्रीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. 

कोण आहेत राहुल शर्मा?

1975 मध्ये दिल्लीत जन्मलेले राहुल शर्मा हे मूळचे कोणत्याही व्यवसायिक पार्श्वभूमीतून नव्हते. त्यांनी कॉमर्स आणि इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेतलं. नोकरी केल्यानंतर त्यांनी फक्त 3 लाख रुपयांच्या कर्जावर 2008 मध्ये मोबाईल मार्केटमध्ये प्रवेश केला आणि आपल्या मित्रांसह राजेश अग्रवाल, विकास जैन आणि सुमीत अरोरा यांच्यासह मायक्रोमॅक्स इन्फॉर्मेटिक्सची स्थापना केली.

त्यावेळी राहुल शर्मा यांनी एक असा फोन बाजारात आणला ज्याची बॅटरी एकदा चार्ज केल्यावर तब्बल एक महिना टिकायची. कमी किमतीत आणि दमदार बॅटरीसह मायक्रोमॅक्सने भारतीय ग्राहकांच्या हृदयात आपली जागा बनवली.

2014 मध्ये मायक्रोमॅक्स कंपनी 1 नंबरला 

2014 मध्ये मायक्रोमॅक्सने सॅमसंगला मागे टाकत भारतातील नंबर 1 स्मार्टफोन ब्रँडचा मुकुट मिळवला. कंपनीचं वार्षिक उत्पन्न 15,000 कोटी रुपयांच्या पार गेलं होतं. मात्र, भारताच्या स्मार्टफोन मार्केटमध्ये Xiaomi, Vivo आणि Oppo सारख्या चायनीज कंपन्यांचा प्रवेश झाला. कमी किंमत, उत्तम फीचर्स आणि आक्रमक मार्केटिंगमुळे मायक्रोमॅक्सची मागी कमी झाली. चीनी कंपनी अलीबाबाने राहुल शर्मा यांना ₹6,700 कोटी गुंतवणुकीचा प्रस्ताव दिला होता, पण त्यांनी तो नाकारला. त्यामुळे मायक्रोमॅक्सला मोठं नुकसान सहन करावं लागलं.

आज राहुल शर्मा यांची एकूण नेटवर्थ सुमारे 1300 कोटी इतकी आहे. ते अजूनही आपला व्यवसाय नव्याने उभा करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. असीन एक यशस्वी अभिनेत्री आणि राहुल शर्मा यशस्वी उद्योजक  आहेत. राहुल शर्मा यांना व्यवसायात अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला असला तरी त्यांनी हार न मानता नवे प्रयोग करत आपली ओळख पुन्हा निर्माण केली.

Read More