Actress Became Hindu at The Age of 27 : भारतीय चित्रपटसृष्टीत सगळ्यात जास्त लोकप्रियता ही अभिनेत्यांना मिळते. प्रत्येक चित्रपटात अभिनेता आणि अभिनेत्री एकत्र दिसतात पण त्या चित्रपटाच्या यशाचं क्रेडिट हे अभिनेत्याला ठरवलं जातं ना की अभिनेत्री. पण अशी एक अभिनेत्री आहे जिचं स्टारडम हे कोणत्याही अभिनेत्यापेक्षा कमी नाही. ती म्हणजे लेडीसुपरस्टार 'नयनतारा'.
कर्नाटकातील एका साधारण कुटुंबात जन्माला आलेली डायना मरियम कुरियन अर्थातच नयनतारा ही सेनेचे अधिकारी कुरियनकोडियाट्टू आणि ओम्मनकुरियन यांची मुलगी आहे. तिच्या अभिनयाच्या प्रवासाविषयी बोलायचं झालं तर 2003 मध्ये मल्याळम चित्रपट मनसिनक्कारे मधून तिनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्या चित्रपटातून तिनं प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. त्यानंतर नयनतारा ही तमिळ चित्रपट दिसली आणि तो चित्रपट तिच्यासाठी सगळ्यात मोठा ठरला. त्यामुळे तिला खरी प्रसिद्धी मिळाली. नयनताराविषयी बोलायचं झालं तर तिनं तमिळ, तेलगू आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. आज नयनतारा भारतातील लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये एक आहे. नयनतारानं शाहरुख खानसोबत 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जवान' या चित्रपटात काम केलं. हा एक असा चित्रपट होता जो बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींचं कलेक्शन करणारा ठरला.
नयनतारा कथितपणे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सगळ्यात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री आहे. ती एका चित्रपटासाठी 5 ते 10 कोटी मानधन म्हणून घेते. त्यामुळे तिची एकूण नेटवर्थ ही 200 कोटी आहे. तर नयनतारा ही आलीशान लाइफस्टाइल जगते. नयनतारानं मुंबईत देखील 100 कोटींचा एक 4BHK फ्लॅट खरेदी केला आहे. त्याशिवाय तिच्याकडे प्रायव्हेट जेट आणि आलिशान गाड्या आहेत.
नयनताराचे चित्रपट जे तिच्या नावानं ओळखले जातात. तर दुसरीकडे तिचं खासगी आयुष्य देखील चांगलंच चर्चेत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नयनतारा ही मूळ ख्रिश्चन आहे. तिनं वयाच्या 27 व्या वर्षी हिंदू धर्म स्वीकारला आणि त्यानंतर तिनं तिचं नाव बदलून नयनतारा ठेवलं.
2022 मध्ये नयनतारानं चित्रपट निर्माता विग्नेश शिवनशी लग्न केलं. त्या आधी नयनताराचं नाव हे एक्टरसिम्बू आणि कोरियोग्राफर प्रभू देवाशी जोडण्यात आलं. दरम्यान, विग्नेश शिवनशी लग्न केल्यानंतर नयनतारानं सरोगसीच्या माध्यामातून जुळ्या मुलांना जन्म दिला.
हेही वाचा : 25 कोटींची नोटीस, मोठा वाद अन् आता परेश रावल यांचं ‘हेरा फेरी 3’ मध्ये कमबॅक
नयनताराच्या आगामी चित्रपटांविषयी बोलायचं झालं तर मुकुथी 'अम्मान 2' साठी ती सध्या काम करते. तर त्याशिवाय ती अनिल रविपुडी आणि मेगास्टार चिरंजीवी यांच्यासोबत आगामी प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे.