Marathi News> मनोरंजन
Advertisement

सलमानसोबत झळकलेल्या 'या' अभिनेत्रीचा किचनमधील रोमँटिक मूड; पतीला पाहताच...

रोमँटिक व्हिडीओ व्हायरल होत आहे.  

सलमानसोबत झळकलेल्या 'या' अभिनेत्रीचा किचनमधील रोमँटिक मूड; पतीला पाहताच...

मुंबई : सोशल मीडियावर दर दिवशी शेकडो व्हिडीओ व्हायरल होतात. या व्हायरल व्हिडीओमध्ये जिथं सेलिब्रिटींचे चेहरे दिसतात त्यांचं व्हायरल होण्याचं प्रमाण तुलनेनं जास्त. अशाच व्हिडीओंच्या गर्दीमध्ये सध्या एक कमालीचा रोमँटिक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

म्हणजे, पती पत्नीचं सुरेख नातं दिसण्यासोबतच एखाद्या रम्य ठिकाणी आपल्या प्रिय व्यक्तीसोबत भटकंतीसाठी जाण्याची इच्छाही हा व्हिडीओ पाहून होत आहे. 

सलमान खान याच्यासोबत 'मैने प्यार किया' या चित्रपटात स्क्रीन शेअर करणाऱ्या अभिनेत्री भाग्यश्री, हिचा हा व्हिडीओ. 

सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असणाऱ्या या चिरतरुण अभिनेत्रीनं तिच्या पतीसोबतचा एक व्हिडीओ आता शेअर केला आहे. 

इथं सकाळच्या सुंदर समयी ती चहा बनवताना दिसत आहे. तितक्यातच तिचा पती हिमालय मागून येतो आणि तिला मिठीत घेतो. 

पतीला पाहता भाग्यश्रीही रोमँटिक होतना या व्हिडीओमध्ये दिसते. इतक्यावरच न थांबता ही जोडी लिपलॉकही करताना दिसते. 

अतिशय खास क्षणांची आठवण या व्हिडीओच्या निमित्तानं तिनं शेअर केली आहे. 

प्रवासाला गेलं असता अशा सुरेख क्षणांचा अनुभव घेता येतो, या क्षणांची फार आठवण येतेय अशा आशयाचं कॅप्शन भाग्यश्रीनं तिच्या या व्हिडीओला दिलं आहे. 

तिचा हा व्हिडीओ सध्या अनेक लाईक्स आणि व्हूअरशिप मिळवताना दिसत आहे. 

Read More