Marathi News> मनोरंजन
Advertisement

चालू कार्यक्रमातच अभिनेत्रीवर का आली पँटमध्येच लघुशंका करण्याची वेळ?

का पाहिला गेला अंत... 

चालू कार्यक्रमातच अभिनेत्रीवर का आली पँटमध्येच लघुशंका करण्याची वेळ?

मुंबई : 'बिग बॉस 15' हा वादग्रस्त रिअॅलिटी शो सध्या अंतिम टप्प्याच्या दिशेनं चालला आहे. जसजसा हा कार्यक्रम शेवटच्या टप्प्याकडे जात आहे तसतसं त्यामध्ये अनेक वळणं येत आहेत. कैकदा अंतिम फेरीसाठीचं टास्क रद्द झाल्यानंतर आता मात्र या शोमधील सेलिब्रिटी स्पर्धकांनी मोठ्या ताकदीनं खेळात सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं. 

'बिग बॉस 15' च्या नव्या एपिसोडमध्ये अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी आणि रश्मी देसाई यांनी एका टास्कमध्ये दमदार कामगिरी केल्याचं पाहायला मिळालं. 

जवळपास 15 तास या दोघीही एका खांबाच्या आधारेच उभ्या होत्या. यादरम्यान, घरातील इतर मंडळींनी त्यांना खांबापासून दूर करण्याचा फार प्रयत्न केला.

देवोलिना आणि रश्मी या मात्र त्या खांबापासून दूर हटल्या नाहीत. 

रश्मीनं मारली बाजी... 
देवोलिना आणि रश्मीच्या या स्पर्धेमध्ये रश्मीनं बाजी मारली. इतकंच नव्हे, तर ती अंतिम फेरीतही पोहोचली. 

टास्टमध्ये केलेल्या कामगिरीबद्दल या दोघींवरही कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ColorsTV (@colorstv)

हे टास्क इतका अंत पाहणारं होतं की, त्यामध्ये देवोलिनानं नाईलाजानं पँटमध्येच लघुशंका केली. असं करण्यापूर्वी तिनं प्रतीक या स्पर्धकाला आपल्यावर पाणी ओतण्यास सांगितलं. 

पाणी ओतल्यानंतरच तिनं लघुशंका केली. देवोलिनाच्या या धाडसाचीही सर्वांची प्रशंसा केली. ही टास्क जिंकण्यासाठी काहीही करु शकते, असं असिम रियाज म्हणाला. 

Read More