Marathi News> मनोरंजन
Advertisement

मी कधीच ड्रग्ज घेतले नाहीत, दीया मिर्झाचं ट्विट करत स्पष्टीकरण

ड्रग्ज प्रकरणात नाव पुढे आल्यानंतर अभिनेत्री दीया मिर्झाने आरोप फेटाळले आहेत.

मी कधीच ड्रग्ज घेतले नाहीत, दीया मिर्झाचं ट्विट करत स्पष्टीकरण

मुंबई : ड्रग्ज प्रकरणात नाव पुढे आल्यानंतर अभिनेत्री दीया मिर्झाने आता यावर प्रतिक्रिया दिली आहे. दीयाने मंगळवारी ट्विट करत सर्व आरोप फेटाळले आहेत. आपल्या संपूर्ण आयुष्यात कधीच ड्रग्ज घेतले नसल्याचं दीयाने म्हटलं आहे.

दीया मिर्झाने ट्विट करत म्हटलं की, 'मी हे वृत्त फेटाळते. कारण ही बातमी खोटी, निराधार आणि वाईट हेतूने पसरली जात आहे.'

'अशा चुकीच्या रिपोर्टिंगचा माझ्या प्रतिष्ठेवर थेट परिणाम होतोय आणि मी अनेक वर्षांच्या मेहनतीने कठोर परिश्रमपूर्वक बांधलेल्या माझ्या करिअरचे नुकसान होत आहे.'

'मी माझ्या आयुष्यात कोणत्याही प्रकारचा कोणताही मादक किंवा प्रतिबंधित पदार्थ मिळविला किंवा वापरला नाही. भारतीय नागरिक असल्याने माझ्या विरोधात पसरवत असलेल्या दुष्प्रचाराबाबत मी कायद्याची मदत घेईल. माझ्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल माझ्या समर्थकांचे आभार.'

सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणात ड्रग्ज अँगल पुढे आल्यानंतर बॉलिवूडचे अनेक ड्रग्ज कनेक्शन पुढे येत आहे. आतापर्यंत श्रद्धा कपूर, दीपिका पादुकोण, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंह यांचं नाव पुढे आलं आहे.

Read More