Marathi News> मनोरंजन
Advertisement

Dipika Kakar च्या घरी येणार नवा पाहुणा; मात्र ईदच्या दिवशी 'ती'ला झाला अचानक रक्तस्राव आणि....!

Dipika Kakar गेल्या काही दिवसांपासून रमजानच्या काळात प्रेग्नंट असूनही रोझा ठेवल्यानं काही लोकांनी तिची स्तुती केली होती तर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. दरम्यान, तिच्या नणंदेनं सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तिनं सगळ्यांना ही माहिती दिली होती. 

Dipika Kakar च्या घरी येणार नवा पाहुणा; मात्र ईदच्या दिवशी 'ती'ला झाला अचानक रक्तस्राव आणि....!

Dipika Kakar : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री दीपिका कक्कड आणि शोएब इब्राहिम यांची जोडी चांगलीच लोकप्रिय आहे. दीपिका आणि शोएब लवकरच आई-वडील होणार आहेत. दीपिकानं काही दिवसांपूर्वी ती प्रेग्नंट असल्याचं सांगितलं होतं. तर आता शोएबच्या कुटुंबात आणखी एक स्त्री प्रेग्नंट असून ती शोएबच्या खूप जवळची आहे. ती दुसरी कोणी नसून शोएबची बहीण आहे. शोएबची बहिण सबानं तिच्या व्लॉगमध्ये म्हटलं आहे की ती लवकरच आई होणार आहे. या व्लॉगमध्ये सबा तिचा पती सनीसोबत दिसली होती. दरम्यान, सबानं यावेळी सांगितलं की तिला PCOS मुळे अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे. पण तिचं बाळ हे सुखरुप असल्याचं देखील तिनं सांगितलं आहे. 

नोव्हेंबर महिन्यात शोएबची बहीण सबा आणि इब्राहिमचा विवाह झाला होता. सबाच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. सबानं स्वत: अनेक गोष्टींचे व्लॉग शेअर केले होते. या व्लॉगच्या मदतीनं सबा तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहिली होती. तर बऱ्याच दिवसांपासून तिची तब्येत ठीक नसल्याचे सबानं तिच्याच एक व्लॉगमध्ये सांगितलं आहे. तर या दरम्यान, तिला बऱ्याचवेळा ब्लिडिंग झाल्याचं देखील तिनं सांगितलं. सबानं या आधी बऱ्याचवेळा प्रेग्नंसी टेस्ट केल्या होत्या. मात्र, त्या सगळ्या प्रेग्नंसी टेस्ट या निगेटिव्ह आल्या होत्या. त्यानंतर सबानं डॉक्टरांकडे प्रेग्नंसी टेस्ट केल्यानंतर त्यांनी मी प्रेग्नंट असल्याचं सांगितलं तर त्यासोबत त्यांनी मला बाळाच्या ठोक्यांचा आवाजही ऐकवला. 

हेही वाचा : Jiah Khan मृत्यू प्रकरणात सुटका झाल्यानंतर सूरज पांचोलीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...

सबानं तिच्या व्लॉगमध्ये तिच्या आरोग्याविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. सबा संपूर्ण परिस्थितीविषयी स्पष्ट बोलताना म्हणाली, ईदच्या आधी मला ब्लीडिंग होत होती आणि ईदच्या दिवशी मला खूप जास्त ब्लीडिंग झाली. माझा भाऊ आणि वहिनीन मला अनेक डॉक्टरांकडे घेऊन गेले. त्यानंतर रविवार आणि सुट्टी असल्यानं मी डॉक्टरांकडे जाऊ शकली नाही. आम्ही बरेच स्कॅन केले आणि वेगवेगळ्या गोळ्या औषध घेतल्या पण तब्येत ठीक नव्हती. माझं खूप ब्लीडिंग सुरु होतं. मला वाटलं की माझ्या बाळाला मी गमावलं आहे. यामुळे मला खूप चिंता वाटू लागली होती आणि माझा बीपी वाढला आणि श्वास घेण्यासही मला त्रास होऊ लागला होता, कारण सनीसुद्धा माझ्यासोबत नव्हता. त्यानंतर चिंतेच काही कारण नाही, बाळ ठीक आहे असे  डॉक्टरांनी सांगितले आणि पुढे त्यांनी 15 दिवसांनी पुन्हा एकदा स्कॅन केलं. दरम्यान, दीपिका विषयी बोलायचं झालं तर प्रेग्नंट असतानाही दीपिकानं रोझाचा उपवास धरला होता. त्यामुळे देखील ती चर्चेत आली होती.

About the Author
Read More