Actress Shocking Photos: कामाच्या ठिकाणी मैत्रीच्या नावाखाली होणारा मानसिक छळ हा महिलांसमोरील सर्वात मोठा प्रश्न असतो. रोज सोबतच काम करायचं असल्याने आपण अशा लोकांची थेट तक्रारही करु शकत नाही आणि ते सहनही करु शकत नाही अशा गोंधळात या महिला अडकलेल्या असतात. मात्र एखाद्या दिवशी भावनांचा बांध फुटतो आणि सरा प्रकारा सार्वजनिक होतो. असेच काहीसे सध्या बंगली मनोरंजनसृष्टीमधील एका अभिनेत्रीसोबत घडलं असून सध्या तिची एक इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेचा विषय ठरतेय.
बंगाली टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील आघाडीच्या नावांपैकी एक असलेली अभिनेत्री दितिप्रिया रॉयने तिच्या सह कलाकारावर इन्स्टाग्राम पोस्टमधून गंभीर आरोप केला आहे. सध्या दितिप्रिया 'चिरोदिनी तुमी जे अमर' या मालिकेत काम करत असून मालिकेत तिचा सहकलाकार असलेला मुख्य अभिनेता जीतू कमलने तिचा छळ केल्याचा आरोप केला आहे. आपल्याविरोधात चुकीच्या टिप्पण्या केल्याचा आरोप अभिनेत्रीने केला आहे. आम्ही दोघे एकमेकांचे चुंबन घेत असल्याचा एआय तंत्रज्ञान वापरुन तयार केलेला फोटो त्याने मला पाठवल्याचा आरोप दितिप्रियाने केला आहे.
मंगळवारी 22 वर्षीय दितिप्रियाने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर बंगाली भाषेत एक पोस्ट केली. "गेल्या काही दिवसांपासून माझ्याबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. यावर मी आजपर्यंत गप्प राहणे पसंत केले. कारण मी 'अज्ञान आनंद असतो' असे मानते. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे, हे सर्व एका फोटोवरून झालेल्या वादातून सुरू झाले. प्रोडक्शन टीम नेहमीच आम्हाला सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी काही फोटो पुरवत असतो. माझ्या सह-अभिनेत्याने त्यापैकी एकाने असाच एक फोटो पोस्ट केला. त्यापैकी एक फोटो असा होता जो मला वैयक्तिकरित्या अजिबात आवडला नाही. त्याने अखेर तो फोटो डिलीट केला. नंतर, अनेक मुलाखतींमध्ये, तो वारंवार म्हणाला, "मी पोस्ट केलेल्या फोटोवर अनेक वाईट आणि अश्लील कमेंट आल्या आणि तिला (मला) त्यामुळे खूप वाईट वाटले." पण सत्य हे आहे की, मी त्याच्याशी याबद्दल कधीच बोलले नाही," असं दितिप्रियाने म्हटलं आहे.
"मी त्या फोटोबद्दलचा माझा आक्षेप फक्त प्रोडक्शन टीमला कळवला कारण तो फोटो त्यांनी काढला होता आणि मला तो माझ्या दृष्टिने अयोग्य वाटला. मी कधीही अश्लील किंवा अश्लील कमेंट्सबद्दल काहीही बोलले नाही आणि त्यावेळी कोणीही मला तो फोटो अयोग्य वाटल्याबद्दल आक्षेप घेतला नाही. उलट, नंतर मला असे ऐकायला मिळालं की, "ती उस्फुर्तपणे गोष्टी हाताळू शकत नाही. तो फक्त एक फोटो होता, त्यावरुन एवढा गोंधळ का?" तो असेही म्हणाला, "मला दितिप्रियाबद्दल खूप आदर आणि प्रेम आहे. तिचं डेडिकेशन एका वेगळ्याच पातळीवर आहे." मी आजही असं मनाते की माझा सह-अभिनेता खरोखर माझा आदर करतो आणि माझी काळजी घेतो," असं ती पुढे म्हणाली.
दितिप्रियाने पुढे सहकलाकार जीतू कमलविरुद्ध धक्कादायक दावा केला आहे. 'राणी राशमोनी' चित्रपटा झळकलेल्या या अभिनेत्रीने नंतर जीतू कमलबद्दल धक्कादायक दावे करताना चाहत्यांना तो पाठवत असलेल्या मेसेजेची झलक दाखवली. "पहिल्या महिन्यापासूनच माझ्या सह-अभिनेत्याने माझ्याशी थेट बोलणे बंद केले आणि फक्त व्हॉट्सअॅपद्वारे संवाद साधला. जेव्हा मी त्याला कारण विचारले तेव्हा तो म्हणाला, 'मला तुझ्या आईची भीती वाटते, पण मला तुझ्याबद्दल खूप आदर आहे'. त्याच्या मनात इतका प्रेम आणि आदर आहे की एके दिवशी त्याने मला विचारले, 'तू त्या कार्यक्रमाला जात आहेस का?' मी उत्तर दिले, 'नाही, माझी डॉक्टरकडे अपॉइंटमेंट आहे.' नंतर त्याने विचारले, 'का, तू गर्भवती आहेस का?' दुसऱ्या एका प्रसंगी, त्याने रात्री उशिरा मला एक एआय-जनरेटेड फोटो पाठवला, ज्यामध्ये आम्ही दोघे चुंबन घेत असल्याचे दाखवले होते आणि लिहिले, 'ठीक आहे, हे तुझ्या बॉयफ्रेंडला पाठव.' त्याने पुढे म्हटले, 'तू आज रात्रीच त्याच्याशी ब्रेकअप करशील.' दुसऱ्या एका प्रसंगात, त्याने मला मेसेज केला की, 'मला तुझ्याशी बोलायचे आहे, तुझ्या आईला कळू नये याची खात्री करुन घे. मला तिची भीती वाटते'," असं म्हणाल्याचा दावा केला आहे.
"सुरुवातीला मी या साऱ्या घटनांकडे विनोद म्हणून पाहत दुर्लक्षित करत गेले. पण कालांतराने त्या गोष्टी मला खूप अस्वस्थ करू लागल्या. सेटवरील काही समस्या मला त्रास देऊ लागल्या. आमच्या शूटिंग फ्लोअरवरील जवळजवळ सर्वांनाच या घटनांबद्दल माहिती असल्याचं समजलं," असं ही अभिनेत्री पुढे म्हणाली.
पुढे ही अभिनेत्री म्हणाली की, तिने जीतूच्या वागण्याकडे बराच काळ दुर्लक्ष केले असले तरी, ती आता गप्प राहू शकत नाही. "मी गप्प राहिले कारण माझ्या कुटुंबाने मला नाटकं करुन एखादं चांगलं काम खराब करू नये अशी शिकवण दिली आहे. मला आमच्या मालिकेमध्ये होऊ द्यायचा नव्हता. पण आता मी गप्प राहू शकत नाही. जेव्हा काही लोक शांतपणे गोष्टी सहन करत राहतात, तेव्हा काही जण मर्यादा ओलांडतात. मी कधीही अन्यायाशी तडजोड केली नाही आणि यापुढेही कधी करणार नाही," असं या अभिनेत्री म्हटलं आहे.
दितिप्रियाने तिच्या इतर सहकलाकारांनाही जीतूसोबत असेच अनुभव आले आहेत असा दावा केलाय. या संपूर्ण प्रकरणावर प्रोडक्शन हाऊसने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया नोंदवलेली नाही.
वादाची सुरुवात कशी झाली?
हा वाद एका फोटोपासून सुरू झाला, जो जीतू कमलने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. दितिप्रियाला तो फोटो वैयक्तिकरित्या अयोग्य वाटला, आणि तिने याबाबत प्रोडक्शन टीमकडे तक्रार केली. जीतूने तो फोटो डिलीट केला, पण त्याने मुलाखतींमध्ये दितिप्रियाला यामुळे वाईट वाटल्याचे चुकीचे सांगितले, ज्यामुळे तिला अस्वस्थ वाटले.
दितिप्रियाने याबाबत आधी का गप्प राहणे पसंत केले?
दितिप्रियाने सांगितले की, तिने सुरुवातीला जीतूच्या वागणुकीकडे विनोद म्हणून दुर्लक्ष केले, कारण तिला मालिकेचे नुकसान होऊ नये असे वाटत होते. तिच्या कुटुंबाने तिला नाटक करुन चांगले काम खराब न करण्याची शिकवण दिली होती. मात्र, सततच्या अस्वस्थतेमुळे आणि मर्यादा ओलांडल्याने ती आता गप्प राहू शकत नाही, असे तिने म्हटले.
जीतू कमलने या आरोपांना काय उत्तर दिले आहे?
जीतू कमलने दितिप्रियाच्या आरोप फेटाळले आहेत. त्याने त्यांचे खासगी व्हॉट्सअॅप चॅट सोशल मीडियावर शेअर केले. त्याने दितिप्रिया 'खूप बालिश' असल्याचे म्हटले आणि तिला कोणीतरी भडकवत असल्याचा दावा केला. त्याने लोकांना तिला माफ करण्याची विनंतीही केली.