Actress Father Used to Call Her Prostitute : छोट्या पडद्यावकील लोकप्रिय अभिनेत्री शाहनी दोशीनं अनेक मालिकांमध्ये काम केलं. शाइनी सगळ्यात आधी संजय लीला भन्साळी यांच्या 'सरस्वतीचंद्र' या मालिकेत दिसली होती. शाइनी ही तिच्या कामापेक्षा तिच्या खासगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहते. या सगळ्यात आता शाइनीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनयाला का निवडलं याविषयी सांगितलं. त्यासोबत वडिलांविषयी तिनं जे सांगितलं ते ऐकूण तुम्ही देखील हैराण व्हाल.
शाइनी दोशीनं सिद्धार्थ कन्ननला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत शाइनीनं तिच्या खासगी आयुष्याविषयी अनेक खुलासे केले. 'माझ्या आईची इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं आणि मला डॉक्टर व्हायचं होतं. माझ्या वडिलांनी आम्हाला खूप आधीच सोडलं होतं. त्यानंतर आम्हाला सांभाळणारं कोणी नव्हतं. मला माझ्या आई-वडिलांचा मुलगा व्हायचं होतं. मला मुलगा होऊन सगळ्यांना सांभाळावं लागलं. जेव्हा मुंबईला मी आले तेव्हा माझ्या अकाऊंटमध्ये फक्त 15 हजार रुपये होते. मला त्यावेळी हे माहित नव्हतं की मी कसं राहणार, कसे पैसे कमावणार. त्यानंतर छोट्या-छोट्या जाहिरातांसाठी अहमदाबादमध्ये मॉडेलिंग केली', असं शाइनीनं यावेळी सांगितलं.
पुढे शाइनी म्हणाली 'मी एका रुढी-परंपरांचे पालन करणाऱ्या गुजराती कुटुंबातून आहे. आमच्या कुटुंबात कलाकारांना दुय्यम स्थान दिलं जातं. मला हे सांगायला कसं तरी वाटतंय की संपूर्ण कुटुंबात अनेक लोकं म्हणायचे की 'ही अभिनेत्री आहे म्हणजे ही वेश्या आहे. इतकंच नाही तर लोकं म्हणायचे की तिची आईच तिच्याकडून अभिनय करून घेते. ही मॉडेलिंग करते तर ही नक्कीच प्रॉस्टिस्टूट असेल. पण जेव्हा माझा पहिला शो सगळ्यांच्या भेटीला आला तेव्हा त्यांचं तोंड बंद झालं. त्या लोकांचे फोन आले जे कधी माझ्या आईशी व्यवस्थित बोलले सुद्धा नव्हते.'
शाइनीनं मुलाखतीत सांगितलं की 'जेव्हा माझे वडील आईशी भांडायचे तेव्हा आईला म्हणायचे की मुलीला रात्रीच्या 3-3 वाजता कुठे घेऊन जातात? धंधा करण्यासाठी घेऊन जातेस? तर त्यांची भाषा फार वाईट होती.'
शाइनीनं वडिलांच्या निधनाविषयी सांगित म्हणाली की, 'तिचे वडील त्यांच्या मित्रांसोबत अमरनाथ यात्रेसा गेले होते. तिथे ते डोक्यावर पडले आणि त्यांच्या मेंदूला दुखापत होईल ब्रेन हॅमरेज झाला. त्यामुळे त्यांचे निधन झाले. इतकं सगळं वाईट झाल्यानंतरही मी माझ्या वडिलांना खांदा दिला आणि अग्नी देखील दिली.'
शाइनीनं प्रेमात देखील फसवणूक मिळाला. त्यांनी सांगितलं की 'लग्नाच्या आधी ती एका मुलाच्या प्रेमात होती. त्याच्यासोबत शाइनी सात वर्ष रिलेशनशिपमध्ये होती. पण त्यानं तिला धोका दिला. त्या मुलाचं अनेक महिलांसोबत अफेअर होतं. त्यानंतर तिनं त्याच्यासोबत ब्रेकअप केला. त्यामुळे ती जवळपास दीडवर्ष डिप्रेशनमध्ये गेली. तिच्या एका मित्रानं तिची काउंसिलिंग केली आणि तिला यातून बाहेर येण्यास मदत केली.'