Marathi News> मनोरंजन
Advertisement

रितेश-जिनिलीया पुन्हा एकदा 'या' बॉलिवूड चित्रपटातून झळकणार? फोटो व्हायरल

अभिनेत्री जिनिलीया आणि रितेश देशमुख हे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यासाठी तयार झालेत. लवकरच ते या बॉलिवूड चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 

रितेश-जिनिलीया पुन्हा एकदा 'या' बॉलिवूड चित्रपटातून झळकणार? फोटो व्हायरल

Genelia -Genelia Deshmukh : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलीया देशमुख हे सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात. दोघांची जोडी सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असते. बॉलिवूडची लोकप्रिय जोडी म्हणून त्यांना ओळखलं जात. रितेश-जिनिलीयाने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अनेकदा दोघे एकत्र चित्रपटांमध्ये दिसतात. त्या दोघांना चित्रपटात एकत्र पाहण्यासाठी त्यांचे चाहते प्रचंड उत्सुक असतात. दोघांचाही मोठा चाहता वर्ग आहे. अशातच ते पुन्हा एकदा एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यासाठी येत आहेत. 

दरम्यान, जिनिलीयाने पहिल्यांदाच आमिर खानसोबत पहिल्यांदाच 'सितारे जमीन पर' या चित्रपटात काम केलं आहे. नुकताच हा चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रचंड प्रतिसाद मिळाला. तर बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख हा अक्षय कुमारच्या 'हाऊसफुल 5' या चित्रपटातून झळकला आहे. त्याच्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी बॉक्स ऑफिसवर भरभरून प्रतिसाद दिला. 

'मस्ती 4' या चित्रपटात झळकणार 

अशातच आता रितेश देशमुख हा त्याच्या आगामी चित्रपट 'मस्ती 4' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे शूटिंग सुरु आहे. या चित्रपटाचे शूटिंग सुरु असतानाच दोघांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. ती म्हणजे 'मस्ती 4' या चित्रपटात अभिनेत्री जिनिलीया देशमुख देखील झळकणार असल्याची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. रिपोर्टनुसार, दोघेही या चित्रपटात एकत्र दिसणार असल्याचं बोललं जात आहे. 

रिपोर्टनुसार, 'मस्ती 4' या चित्रपटाचे शूटिंग हे परदेशात सुरु आहे.  सोशल मीडियावर या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा एक व्हिडीओ तिथे जमलेल्या एका व्यक्तीने काढला असून तो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शूटिंग दरम्यान प्रचंड गर्दी झालेली दिसत आहे. तर रितेश देशमुख आणि जिनिलीया देखील या व्हिडीओत दिसत आहेत. त्यासोबतच त्यांची मुले देखील शूटिंगच्या ठिकाणी दिसत आहेत. 

पाहा व्हिडीओ

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. ज्यामध्ये काही जणांनी ती 'मस्ती 4' या चित्रपटात दिसणार असल्याचं म्हटलं आहे तर काही जणांनी ती फक्त चित्रपटाच्या सेटवर शूटिंग पाहण्यासाठी गेली असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, या व्हायरल फोटोमध्ये जिनिलीया स्टेप्स करताना दिसत आहे. त्यामुळे चाहत्यांनी असा अंदाज लावला आहे की, दोघेही पुढील चित्रपटात एकत्र झळकणार आहेत.  

Read More