Actress Attracted Towards Aishwarya Rai: अभिनेत्री ऐश्वर्या राय म्हणजे सौंदर्याची खाणच! मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकण्यापासून ते चित्रपटांमधून आपल्या सौंदर्याने चाहत्यांना भुरळ पाडणारी ऐश्वर्या आजची तिच्या सौंदर्यामुळे चर्चेचा विषय असते. अनेक अभिनेत्यांसोबत तिचं नाव यापूर्वी जोडलं गेलं आहे. मात्र आता एका वेगळ्याच विषयामुळे ऐश्वर्या चर्चेत आहे. एका चित्रपटाच्या सेटवर आपण ऐश्वर्याकडे आकर्षित झालो होतो, असा आश्चर्यचकित करणार खुलासा अभिनेत्रीनेच केला आहे. सिद्धार्थ कन्ननच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झालेली ही अभिनेत्री ऐश्वर्याबरोबर एका चित्रपटात झळकली होती. याच चित्रपटाच्या शुटींगदरम्यानचा किस्सा तिने सांगितला आहे.
आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलतोय तिचं नाव आहे बॉबी डार्लिंग! प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांच्या नावाजलेल्या 'ताल' चित्रपटामध्ये ऐश्वर्या प्रमुख भूमिकेत होती तर बॉबी डार्लिंगने या चित्रपटामध्ये एक छोटाशी भूमिका साकारली होती. भूमिका कमी कालावधीसाठी होती तरी त्याच्या शुटींगसाठी बॉबी डार्लिंग जवळपास 25 दिवस चित्रपटाच्या सेटवर होती. याच चित्रपटाच्या शुटींगदरम्यानचा अनुभव बॉबी डार्लिंगने शेअर केला आहे. शुटींगदरम्यान मी ऐश्वर्याकडे आकर्षित झाले होते, अशी कबुली बॉबी डार्लिंगने दिली आहे. ऐश्वर्या दिसायला खूप सुंदर होती आणि तिचा बांधा देखील सुडैल होता. तिची फिगर फारच आकर्षक होती, असंही बॉबी डार्लिंग म्हणाली.
"सुभाष घाईंनी मला 'ताल'मध्ये काम दिलं. भूमिका छोटीच होती मात्र त्यासाठीही मला 25 दिवस शुटींग करावं लागलं. मात्र मी साकारलेली भूमिका एडीटमध्ये गेली. या गोष्टी आमच्या हाती नसतात. मला या शुटींगसाठी रोजचे अडीच हजार रुपये मिळायचे. सुभाष घाईंनी ऑडिशन घेतल्यानंतर हिला ऐश्वर्याच्या डिझायनरची भूमिका घ्या, असं सांगितलं होतं. त्यानंतर मला ती भूमिका मिळाली," असं बॉबी डार्लिंगने या चित्रपटात वर्णी कशी लागली त्याबद्दलची आठवण सांगताना म्हटलं.
"आम्हाला जंगल मे बोले कोयल गाण्याचं शुटींग करायचं होतं. ऐश्वर्या माझ्या समोर उभी होती. त्यावेळी सुभाष घाईंनी मला तिच्या ब्लाऊजचं हूक लाव, असं सांगितलं. मी सुभाष घाईंसमोर घाबर घाबरतच ऐश्वर्याच्या ब्लाऊजचं हूक लावलं. मी एवढी घाबरले होते की तिच्या ब्लाऊजजवळ हात नेताना माझे हात थरथरत होते. मात्र त्याच वेळी मला वाटतं की माझं काय नशीब आङे. मला काम हवं होतं अन् भगवान शंकारने मला थेट ऐश्वर्याच्या शेजरी उभं केलं. ऐश्वर्या फारच विनम्र होती. ती फारच साधी होती. तिच्याबरोबरच काम करताना मी तिच्याकडे आकर्षित झाले. मी मुलगा असते तर मला अशीच मुलगी हवी असती," असंही बॉबी डार्लिंगने म्हटलं.
या पॉडकास्टमध्ये बॉबी डार्लिंगने तिच्या आयुष्याबद्दल अनेक खुलासा केले आहेत. आईच्या मृत्यूसाठी बॉबी डार्लिंगने स्वत:ला दोष दिला आहे. सध्या बॉबी डार्लिंगची मुलाखत चांगलीच चर्चेत आहे.