Marathi News> मनोरंजन
Advertisement

गार्डन, समुद्रकिनाऱ्यानंतर आता अभिनेत्रीचं बाथटबमध्ये बोल्ड फोटोशूट

सोशल मीडियावर सक्रिय असणारी ही अभिनेत्री आहे... 

गार्डन, समुद्रकिनाऱ्यानंतर आता अभिनेत्रीचं बाथटबमध्ये बोल्ड फोटोशूट

मुंबई : फोटोशूटसाठी विविध प्रॉ़प्स वापरण्याकडे हल्ली अभिनेत्रींचा बराच कल दिसतो. हा कल आता कमालीचा ट्रेंडमध्येही आल्याचं पाहायला मिळत आहे. नुकतंच एका लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्रीनं अशाच एका प्रॉ़पचा भन्नाट वापर करत नवं फोटोशूट केलं आहे. 

तिचं सौंदर्य पाहून कोण तिला परमसुंदरी म्हणतंय, तर कोण तिचा उल्लेख लवंगी मिरची असाही करत आहे. 

सोशल मीडियावर सक्रिय असणारी ही अभिनेत्री आहे, हिना खान. 

हिनानं बाथटबमध्ये तिचं नवं ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे. यामध्ये बाथटबमध्ये लाल आणि पांढऱ्या रंगाच्या मिनी ड्रेस आणि हाय हिल्समध्ये ती शोभून दिसत आहे. 

लूक आणि त्याला साजेसा तिचा अॅटिट्यूड या फोटोंना चार चाँद लावून जात आहे. 

हिनाच्या या फोटोंना असंख्य लाईक्स मिळताना दिसत आहेत. 

स्ट्रीप्ड ड्रेसमध्ये तिच्या बोल्ड अदा म्हणजे जाळ अन् धूर संगतच... ही अशीच काहीशी चाहत्यांची अवस्था होत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by HK (@realhinakhan)

मालिका विश्वात गाजलेल्या हिनानं कला वर्तुळामध्ये ज्या वेगानं तिचा चाहतावर्ग निर्माण केला आहे ते कौतुक करण्याजोगं आहे. 

त्यातच तिचे असे नवनवीन फोटोशूट दर दिवशी चाहत्यांच्या संख्येत भरच टाकताना दिसत आहेत. 

Read More