Marathi News> मनोरंजन
Advertisement

तौबा तौबा! समुद्रकिनारी बिकिनी, रमजान सुरु होताच बुरखा- हिजाब, ओळखा या अभिनेत्रीला

हाय स्लिट गाऊनमध्ये दिसणारी ही अभिनेत्री आता चक्क बुरख्यामध्ये दिसत आहे.  

तौबा तौबा! समुद्रकिनारी बिकिनी, रमजान सुरु होताच बुरखा- हिजाब, ओळखा या अभिनेत्रीला

मुंबई : दर दिवशी सोशल मीडियावर बोल्ड फोटो, धमाकेदार स्टाईल स्टेटमेंटनं सर्वांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या एका अभिनेत्रीनं तिच्या नव्या लुकनं हैराण केलं आहे.  हैराण होण्याचं कारण म्हणजे एरव्ही बिकिनी आणि हाय स्लिट गाऊनमध्ये दिसणारी ही अभिनेत्री आता चक्क बुरख्यामध्ये दिसत आहे.

निमित्त आहे ते म्हणजे रमजानच्या पवित्र महिन्याची सुरुवात. कायमच फॅशन ट्रेंड फॉलो करण्याला प्राधान्य देणारी ही अभिनेत्री सध्या काह धार्मिक प्रथा निभावताना दिसत आहे. 

मुख्य म्हणजे तिला बुरखा आणि हिजाबमध्ये पाहिल्यानंतर अनेकांना तिची ओळखच पटेना. ही कोण.... हिला कुठेकरी पाहिलंय अशाच प्रतिक्रिया तिचे फोटो पाहिल्यानंतर सर्वांनी दिल्या. 

हे फोटो पाहून तुम्हाला तरी कळतंय का ही अभिनेत्री कोण आहे? बघा बुद्धिला चालना देऊन... 

नाही जमत आहे ना? बुरख्यामध्ये ओळखचताही न येणारी ही अभिनेत्री आहे हिना खान. 

fallbacks

रमजानची सुरुवात होताच हिनानं अल्लाहकडे दुआ केली. त्यादरम्यानच ती बुरख्यामध्ये दिसली. हा लूकही स्टायलिश करण्यासाठी तिनं फुटवेअर म्हणून शूजना प्राघधान्य दिलं होतं. 

fallbacks

fallbacks

हिनाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधताना दिसत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार हिनासुद्धा रमजानमध्ये रोजा ठेवते. 

Read More