Marathi News> मनोरंजन
Advertisement

अग्गंबाई, लोकप्रिय अभिनेत्री होणार हृता दुर्गुळेची सासूबाई

सर्वांच्याच नजरा वळल्या.   

अग्गंबाई, लोकप्रिय अभिनेत्री होणार हृता दुर्गुळेची सासूबाई

मुंबई : मराठी कलाजगतामध्ये फुलपाखरू, मन उडू उडू झालं अशा मालिकांच्या माध्यमातून आपला प्रेक्षकवर्ग निर्माण करणाऱ्या अभिनेत्री हृता दुर्गुळे हिचीच सध्या चर्चा सुरु आहे. तिची चर्चा होण्यामागचं कारणंही तसंच आहे. कारण, हृतानं तिच्या आयुष्यातील एका खास व्यक्तीला सर्वांसमोर आणलं आहे. 

हृताचं प्रेम असणारी ही व्यक्ती म्हणजे प्रतीक शाह. रिलेशनशिप जाहीर करत या मराठमोळ्या अभिनेत्रीनं काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि पाहता पाहता सर्वांच्याच नजरा वळल्या. 

तरुणांच्या हृदयाची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हृतानं तिच्या आणि प्रतीकच्या नात्याची ग्वाही देताच तिच्या लग्नाच्या चर्चांनीही जोर धरला. 

नातं जाहीर केलंय, आज ना उद्या लग्न होईलच अशीच प्रतिक्रिया चाहत्यांनी दिली. ज्यानंतर आता हृताच्या प्रेमात असणारा हा प्रतीक आहे तरी कोण, याबाबतही कुतूहल व्यक्त करण्यात आलं. 

बऱ्याच लोकप्रिय हिंदी मालिकांचं दिग्दर्शन करणारा प्रतीक हा जितका चर्चेत आला तितकीच त्याची आईसुद्धा. 

मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम करणाऱ्या मुग्धा शाह या अभिनेत्रीचा प्रतीक मुलगा आहे. त्यामुळं हृताच्या होणाऱ्या सासूबाईसुद्धा सर्वांचं लक्ष वेधत आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prateek Shah (@prateekshah1)

मुग्धा यांनी बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे. मुख्य म्हणजे खुद्द हृतानंही त्यांच्यासोबत काम केलं आहे. त्यामुळं आता ही सासू- सुनेची जोडी येत्या काळात चाहत्यांसमोर पुन्हा नेमकी कोणत्या रुपात एकत्र येते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

Read More