Marathi News> मनोरंजन
Advertisement

तब्येत बिघडली, जान्हवी रुग्णालयात दाखल, मित्राने सांगितलं कारण

अभिनेत्री जान्हवी कपूरची प्रकृती खालावल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिनेत्रीला अन्नातून विषबाधा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. 

तब्येत बिघडली, जान्हवी रुग्णालयात दाखल, मित्राने सांगितलं कारण

Janhvi Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरची तब्येत बिघडली आहे. तिला क्षिण मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल केलं आहे. जान्हवीला अन्नातून विषबाधा झाली असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. 

अभिनेत्री जान्हवी कपूर ही चेन्नईला गेली होती. ती मंगळवारी परतत असताना तिने विमानतळावर काहीतरी खाल्ले. त्यानंतर जान्हवी घरी आली असता तिची प्रकृती खालावली. त्यानंतर तिला अशक्तपणा जाणवत होता. तब्येत बिघडल्याने तिला बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

व्यस्त दिनचर्याचा आरोग्यावर परिणाम

अभिनेत्री जान्हवी कपूरचे नाव सध्या अनेक मोठ्या प्रोजेक्ट्सशी जोडले जात आहे. लवकरच ती साऊथ आणि बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे. एका चित्रपटाचे शूटिंग संपत नाही तोच तिला दुसऱ्या चित्रपटाचे प्रमोशन सुरु होते. अशातच तिने अनंत-राधिका यांच्या लग्नातही हजेरी लावली होती. याचा सर्व परिणाम तिच्या आरोग्यावर झाला.  त्यामुळे अभिनेत्रीची तब्येत बिघडली. सध्या अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

अनंत-राधिकाच्या लग्नात जान्हवी

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर अनेक दिवसांपासून तिच्या चित्रपटाचे शूटिंग आणि अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नामधील कार्यक्रमात जान्हवी उपस्थित होती. जान्हवीच्या अप्रतिम फॅशन सेन्सने खळबळ उडवून दिली होती. या सोहळ्यातील खास लुक देखील तिने चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

डिस्चार्ज कधी? 

 जान्हवीची तब्येत सध्या ठीक आहे. शुक्रवारपर्यंत तिला डिस्चार्ज देणार असल्याचं म्हटलं जात आहे. चाहत्यांनी देखील तिला लवकर बरे होण्यासाठी  शुभेच्छा दिल्या आहेत. 

Read More