Marathi News> मनोरंजन
Advertisement

जस्मिन भसीन आणि अली गोनीचा ब्रेकअप? अभिनेत्रीने शेअर केली पोस्ट

जस्मिन भसीन आणि अली गोनी 3 ते 4 वर्षांपासून एकत्र आहेत. चाहत्यांनी त्यांच्यावर भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आहे. सोशल मीडियावर त्यांचा ब्रेकअप झाल्याची पोस्ट व्हायरल होत आहे. जाणून घ्या सविस्तर

जस्मिन भसीन आणि अली गोनीचा ब्रेकअप? अभिनेत्रीने शेअर केली पोस्ट

Jasmin Bhasin : टीव्ही अभिनेत्री जस्मिन भसीन आणि अली गोनीवर चाहत्यांनी भरभरुन प्रेम केले. दोघेही आधी मित्र होते आणि 'बिग बॉस' आल्यानंतर दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. सोशल मीडियावर देखील दोघांनी प्रेम व्यक्त करायला सुरुवात केली. सध्या जस्मिन भसीनची एक पोस्ट पाहून चाहत्यांना देखील धक्का बसला आहे. 

पण अलीकडेच त्यांच्या ब्रेकअपच्या अफवा पसरु लागल्याने चाहते देखील चिंतेत पडले होते. अशातच अभिनेत्री जस्मिन भसीनने तिच्या X वर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने असं म्हटले आहे की, प्रेमाची विचित्र गोष्ट म्हणजे ते तुमच्यापासून दूर गेल्यावर अधिक जाणवते. 

अभिनेत्रीची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकांनी या पोस्टला जस्मिन भसीन आणि अली गोनीच्या ब्रेकअपशी जोडले आहे. तर काही चाहत्यांनी पोस्टवर कमेंट्स देखील केल्या आहेत. एका चाहत्यांने 'ब्रेकअप लोडिंग...'अशी कमेंट केली आहे.  

fallbacks

अभिनेत्रीकडून ब्रेकअपच्या बातम्यांना पूर्णविराम

अली गोनीसोबत ब्रेकअप झाल्याच्या अफवेवर जस्मिन भसीनला राग आला आणि तिने युजर्सवर जोरदार टीका केली आहे. युजर्सच्या पोस्टवर कमेंट करुन अभिनेत्री जस्मिन भसीनने ब्रेकअपच्या बातम्यांना पूर्णविराम दिला आहे.

जस्मिन भसीनच्या या पोस्टमुळे चाहत्यांना देखील दिलासा मिळाला आहे. कारण जस्मिन भसीन आणि अली गोनी अजूनही एकत्र आहेत आणि त्यांचे ब्रेकअप झालेले नाही हे स्पष्ट झाले आहे. 

 'टशन-ए-इश्क' मधून करिअरची सुरुवात

टीव्ही अभिनेत्री जस्मिन भसीनने 'टशन-ए-इश्क' मधून करिअरची सुरुवात केली होती. 'दिल से दिल तक', 'नागिन' आणि 'दिल तो हॅप्पी है जी' या सारख्या मालिकांमध्ये अभिनेत्रीने काम केलं आहे. सोशल मीडियावर अभिनेत्री खूप सक्रिय असते. नेहमी चाहत्यांना नवनवीन लुकमधील फोटो शेअर करत असते. मोठ्या प्रमाणात अभिनेत्रीचा इन्स्टाग्रामवर चाहता वर्ग आहे. 

 

Read More