Marathi News> मनोरंजन
Advertisement

घटस्फोटानंतर अभिनेत्रीने धरला डॉक्टरचा हात, लग्न केलं त्यानंतर...

घटस्फोटानंतर अभिनेत्रीने डॉक्टरसोबत लग्न केलं त्यानंतर...  

घटस्फोटानंतर अभिनेत्रीने धरला डॉक्टरचा हात, लग्न केलं त्यानंतर...

मुंबई : कलाविश्वात सर्वाधिक चर्चा सेलिब्रिटींच्या रिलेशनशिपची असते. टेलिव्हिजन वर्तुळात आपली वेगळी ओळख प्रस्थापित करणारी आणि सध्याच्या घडीला अतिशय आनंदात असणारी ही अभिनेत्री आहे, काम्या पंजाबी. काम्या पंजाबीने 2020 साली डॉ. शलभ दांगसोबत लग्न केलं. तिच्या लग्नाला आज दोन वर्ष पूर्ण झाले आहेत. काम्याने जोडीदारासोबत पोस्ट देखील शेअर केली. पोस्टमध्ये काम्याने लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  

शलभ हेल्थकेयर इंडस्ट्रीशी संबंधीत आहे. काम्या तिच्या आरोग्यासंबंधी काही समस्यांबद्दल शलभला भेटली होती. त्याच दरम्यान त्या दोघांमध्ये जवळीक वाढली. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

याआधी काम्याचा विवाह बंटी नेगी या व्यावसायिकाशी झाला होता. परंतु 2013 मध्ये या दोघांचे मार्ग वेगळे झाले. घटस्फोट झाल्यानंतर दुसऱ्या लग्नाचा विचार करणं काम्यासाठी फार कठीण होतं. 

पण आनंदी आयुष्यासाठी 2020 साली शलभ आणि काम्याने लग्न केलं.  काम्याला 9 वर्षांची मुलगी आहे. तर शलभला ईशान हा 10 वर्षांचा मुलगा आहे. आता चौघं कुटुंब म्हणून आनंदाने राहतात. 

Read More