Marathi News> मनोरंजन
Advertisement

घरचं 1 लाखांचं लाईट बील पाहून कंगनाला बसला धक्का; राज्य सरकारला म्हणाली, 'ज्या घरात मी...'

अभिनेत्री कंगना रणौतने तिच्या मनालीमधील घराच्या वीज बिलाबद्दल धक्कादायक माहिती शेअर केली आहे. 

घरचं 1 लाखांचं लाईट बील पाहून कंगनाला बसला धक्का; राज्य सरकारला म्हणाली, 'ज्या घरात मी...'

Kangana Ranaut : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत तिच्या संसदीय कर्तव्यांमध्ये आणि तिच्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अभिनेत्री कंगना रणौत ही नुकतीच हिमाचल प्रदेशमधील मंडी येथील एका राजकीय कार्यक्रमासाठी पोहोचली होती. यावेळी कंगना रणौतने कार्यक्रमात बोलताना तिच्या मनालीमधील घराच्या वीज बिलाबद्दल धक्कादायक माहिती शेअर केली. तिच्या मनाली येथील घराचे वीज बिल 1 लाख रुपये आले आहे. जरी ती तिथे राहत नसली तरी. 

कंगना रणौतचे मनालीमधील घर रिकामे आहे. तरी देखील तिला 1 लाख रुपये बिल आले आहे. मंडी येथील एका कार्यक्रमात अभिनेत्री कंगनाने वीज विभागाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केला आहे. हिमाचल प्रदेशची स्थिती चिंताजनक असल्याचे देखील तिने सांगितले. कंगनाचे हे विधान सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. लोक कंगनाला वीज विभागाकडे तक्रार करण्याचा सल्ला देत आहेत. 

कंगना रणौतच्या मनालीमधील घराचे वीज बिल 1 लाख रुपये

कंगना रणौतने हिमाचल प्रदेश सरकारवर जोरदार टीका केली. या महिन्यात मला माझ्या मनाली येथील घराचे 1 लाख रुपये वीज बिल आलं आहे. जिथे मी राहतही नाही. सध्या हिमाचल प्रदेशची परिस्थिती खूप वाईट आहे. आम्ही जे वाचतो आणि जे घडत आहे त्याची आम्हाला लाज वाटते आहे. पण आपल्याकडे एक संधी आहे.  तुम्ही सर्वजण माझे भाऊ आणि बहिणी आहात. तुम्ही सर्वजण जमिनीवर खूप मेहनत करता ही खूप चांगली गोष्ट आहे. आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की आपण या देशाला आणि राज्याला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जावे. कंगना म्हणाली की, हे लोक लांडगे आहेत. आपल्या राज्याला त्यांच्या तावडीतून मुक्त करावे लागेल असं तिने सांगितले. 

अभिनेत्री कंगना रणौतचा शेवटचा चित्रपट 'इमर्जन्सी' होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. आता चाहते तिच्या आगामी चित्रपटाची वाट पाहत आहेत. ज्यामध्ये ती लवकरच आर.माधवनसोबत काम करताना दिसणार आहे. या चित्रपटात कंगना रणौत पुन्हा एकदा तनुच्या भूमिकेत दिसणार आहे. 

Read More