Marathi News> मनोरंजन
Advertisement

Katrina Kaif च्या लग्नानंतर करिनाने जे केलं, पाहून सगळ्यांनाच धक्का !

करिनाची एक गोष्ट 

 Katrina Kaif च्या लग्नानंतर करिनाने जे केलं, पाहून सगळ्यांनाच धक्का !

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल हे लग्नबंधनात अडकले आहेत. 9 डिसेंबर रोजी या स्टार जोडप्याने राजस्थानमधील सवाई माधोपूर येथे शाही पद्धतीने सात फेरे घेतले. लग्नाचे सुंदर फोटोही समोर आले आहेत. अखेर, फोटो शेअर करून कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी त्यांच्या लग्नावर शिक्कामोर्तब केले आहे.

फोटो शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले - फक्त आपल्या हृदयात प्रेम आणि कृतज्ञता आहे ज्याने आपल्याला या क्षणापर्यंत आणले आहे.तुमच्या सर्वांच्या प्रेमाने आणि आशीर्वादाने आम्ही हा नवा प्रवास सुरू करत आहोत. विकी कौशल आणि कतरिना कैफचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. हे फोटो समोर येताच सोशल मीडियावर लोकांनी त्यांचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली.

fallbacks

आलिया भट्टपासून दीपिका पादुकोणपर्यंत सर्वांनी विकी आणि कतरिनाला नवीन आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या.आता या यादीत आणखी एका नावाचा समावेश झाला असून ते नाव आहे बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरचे. या सगळ्यांसोबतच कतरिना आणि विकीच्या चाहत्यांनी करिनाची एक गोष्ट विशेष लक्षात घेतली आहे. याबद्दल चाहत्याने सोशल मीडियावर ट्विट करून माहितीही दिली आहे.

आपल्या ट्विटमध्ये चाहत्याने लिहिले की, करीना कपूर खानने कतरिना कैफला फॉलो करण्यासाठी तिच्या लग्नाची वाट पाहिली. यासोबतच चाहत्याने हसणारा इमोजीही शेअर केला आहे. कतरिना कैफ आणि रणबीर कपूर एकेकाळी रिलेशनशिपमध्ये होते.

त्यादरम्यान करीना कपूर आणि कतरिना यांच्यात जबरदस्त बाँडिंगही पाहायला मिळाले. 6 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघे वेगळे झाले. त्यानंतर कतरिना कैफ आणि करीना कपूर खान यांच्यात मैत्री झाली नाही.

 

 

Read More