Marathi News> मनोरंजन
Advertisement

दारूच्या नशेत प्रसिद्ध अभिनेत्रीकडून पोलिसांना शिवीगाळ, जावं लागलं थेट तुरुंगात

प्रसिद्ध अभिनेत्रीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. 

दारूच्या नशेत प्रसिद्ध अभिनेत्रीकडून पोलिसांना शिवीगाळ, जावं लागलं थेट तुरुंगात

मुंबई : साऊथ इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री काव्या थापरला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. काव्यावर दारूच्या नशेत कार चालवून एका व्यक्तीला ठोकल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे मुंबई पोलिसांनी या अभिनेत्रीला थांबवल्यावर तिने पोलिसांशी हुज्जत घातली आणि अश्लील भाषा वापरली. सध्या काव्या थापरला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

ड्रिंक करुन चालवत होती कार 
एएनआयच्या ट्विटवरून ही माहिती देण्यात आली आहे. एका पोलिस अधिकारी यांनी सांगितलं की, अभिनेत्रीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. गुरुवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास जुहू येथील जेडब्ल्यू  हॉटेलजवळ ही घटना घडली. जेव्हा अभिनेत्री एसयूव्ही कार चालवत होती तेव्हा ती नशेत होती. पोलीस अधिकाऱ्याने पुढे सांगितलं की, थापर हिचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि ती पार्क केलेल्या कारला मागून धडकली. या संपूर्ण घटनेची माहिती एका वाटसरूने पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर जुहू पोलीस घटनास्थळी पोहोचले.

पोलिसांना पाहून अभिनेत्री करु लागली शिवीगाळ
अधिकाऱ्यांनी पुढे सांगितलं की, पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहोचताच अभिनेत्री काव्या थापरने त्यांना पाहून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आणि त्यांच्यावर हात उचलण्याचाही प्रयत्न केला. या सगळ्या प्रकारानंतर अभिनेत्रीला अटक करण्यात आली.

Read More