Marathi News> मनोरंजन
Advertisement

'माझं प्रेम...', मानसी नाईकच्या कथित बॉयफ्रेंडने शेअर केला 'तो' फोटो, जाणून घ्या त्याच्याबद्दल...

 आता मानसी नाईकचा कथित बॉयफ्रेंडच्या एका पोस्टने चर्चांना उधाण आले आहे. 

'माझं प्रेम...', मानसी नाईकच्या कथित बॉयफ्रेंडने शेअर केला 'तो' फोटो, जाणून घ्या त्याच्याबद्दल...

Manasi Naik Boyfriend Rahul Khismatrao : उत्तम नृत्यशैलीमुळे प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवणारी अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक.  ‘बाई वाड्यावर या’, ‘वाट बघतोय रिक्षावाला’ या गाण्यांमधून तिने चाहत्यांना वेड लावले. मानसी नाईक ही गेल्या वर्षभरापासून वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. मानसी नाईकने काही महिन्यांपूर्वीच तिचा पती प्रदीप खरेरापासून कायदेशीररित्या घटस्फोट घेतला. आता मानसी नाईकचा कथित बॉयफ्रेंडच्या एका पोस्टने चर्चांना उधाण आले आहे. 

मानसी नाईकने तिचा यंदाचा वाढदिवस पॅरिसमध्ये साजरा केला. त्यानंतर तिच्या अनेक पोस्टद्वारे ती पुन्हा प्रेमात पडल्याचे संकेत देत होती. मानसी नाईकने काही दिवसांपूर्वीच मला प्रेम रोग झालाय अशा आशयाचा एक रील व्हिडीओ शेअर केला होता. यासोबतच तिने "मी काही पाऊंड्स वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, कारण प्रेमात पडल्यानंतर खूप भूक लागते" असे एका रीलच्या कॅप्शनमध्ये म्हटले होते. त्यासोबतच एका मुलाखतीदरम्यान तिने ती पुन्हा प्रेमात पडल्याचे म्हणाली होती. 

मानसीने ‘हंच मीडिया’ला दिलेल्या मुलाखतीत तिचा वाढदिवसाबद्दल भाष्य केले होते. मानसीला डोळ्यावर पट्टी बांधून आयफेल टॉवरच्या इथे नेण्यात आलं होतं. याचबरोबर मानसीला फॉसिल वॉच बर्थडे गिफ्ट म्हणून मिळालं होतं. याबद्दल बोलताना तिने “मला सुंदर वेळ देणाऱ्या व्यक्तीचं नाव मी लवकरच गुलदस्त्यातून बाहेर काढेन. पण बरं वाटलं की, असा कोणीतरी आहे; जो तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य बघायला काहीही करू शकतो.” असे म्हटले होते.

fallbacks

इन्स्टाग्रामवर शेअर केली स्टोरी 

आता मानसी नाईकने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. तिने तिच्या आयुष्यातील खास व्यक्तीची पोस्ट रिपोस्ट केली आहे. या पोस्टद्वारे तिने प्रेमाची कबूली दिल्याचे म्हटलं जात आहे. मानसीच्या आयुष्यातील खास व्यक्तीचे नाव राहुल खिसमतराव असे आहे. राहुलने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. यात त्याने एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत तो स्वत:, मानसी आणि आयफेल टॉवर दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देताना त्याने "मी माझं प्रेम एका फ्रेममध्ये कॅप्चर करत आहे", असे म्हटले आहे. 

राहुलची ही पोस्ट मानसीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे. त्यावर तिने एका बाहुलीच्या लाजण्याचा इमोजी पोस्ट केला आहे. त्यामुळे आता मानसी आणि राहुल यांच्या रिलेशनची चर्चा रंगू लागली आहे. पण अद्याप मानसीने याबद्दलचा कोणताही खुलासा केलेला नाही.  दरम्यान  मानसीचा कथित बॉयफ्रेंड राहुल खिसमतराव हा अंतराळ शास्त्रज्ञ आहे. तसेच युरोपियन संसदेचा युवा राजदूत म्हणूनही तो काम करतो. त्यासोबतच तो अखेड फाऊंडेशन या संस्थेचा एमडी आहे. तो सध्या जर्मनीत असतो. 

Read More