Actress who Murdered her Friend : 2008 साली संपूर्ण देश हादरवणारी एक घटना घडली होती. ही घटना ही एका कन्नड अभिनेत्रीच्या संबंधीत होती. आता ही नेमकी घटना काय त्याविषयी जाणून घेऊया. त्या अभिनेत्रीचं नाव मारिया सुसाइराज. मारिया सुसाइराजनं तिच्या बॉयफ्रेंडसोबत मिळून आपल्या मित्राची हत्या केली आणि त्याच्या शरिराचे 300 तुकडे केले. इतकंच नाही तर त्याच्या मृतदेहासमोर बॉयफ्रेंडसोबत शारिरीक संबंध बनवले. जेव्हा या हत्याकांडाविषयी माहिती समोर आली तेव्हा ते ऐकूण सगळ्यांच धक्का बसला.
मारिया सुसाइराज मूळची कर्नाटकची होती. ती कन्नड चित्रपटांमध्ये काम करत करायची, पण तिचं स्वप्न हे बॉलिवूडमध्ये स्वत: चं स्थान निर्माण करण्याचं होतं. त्यासाठी ती मुंबईला आली. तिचं कुटुंब अभिनयाविरुद्ध होतं, तरीसुद्धा ती बंगळुरुला अभिनय करण्यासाठी गेली आणि तिथून तिच्या अभिनयातील करिअरची सुरुवात झाली. इतकं होऊनही तिला रिजनल भाषांमध्ये तिचं करिअर करायचं नव्हतं तिला बॉलिवूडमध्ये स्वत: चं स्थान निर्माण करायचं होतं. त्यामुळे ती मुंबईत आली.
मुंबईत ऑडिशन्स देत असताना नीरज ग्रोवरशी मारियाची ओळख झाली. नीरज हा बालाजी टेलिफिल्म्समध्ये काम करत होता. नीरज तिला ऑडिशनमध्ये मदत करु लागला. हळू-हळू दोघांमधील जवळीकता वाढू लागली, पण मारिया आधीपासूनच जेरोम मैथ्यू या आर्मी ऑफिसरशी रिलेशनशिपमध्ये होती. जेरोम मैथ्यू याची आधीची पोस्टींग ही मैसूरमध्ये होती पण काही काळानंतर त्याची पोस्टींग ही पुण्यात झाली होती.
दरम्यान, मुंबईत शिफ्ट झाल्यानंतर मारिया ही नीरजसोबत त्याच्यात घरात राहू लागली. नीरनं त्याला तिच्यासाठी प्रेमाच्या भावना असल्याचं सांगितलं, पण मारियानं आपल्यात फक्त मैत्रीचं नातं आहे हे सांगितलं. इतकंच नाही तर तिनं बॉयफ्रेंड जेरोमला देखील सांगितलं की नीरज हा तिचा फक्त मित्र आहे. तो तिच्यावर एकतरफी प्रेम करतो. तर मारिया त्याकाळत नीरजसोबत लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहत होती. तर काही दिवसात मारियानं नीरजचा फ्लॅट सोडला आणि दुसऱ्या ठिकाणी ती शिफ्ट झाली.
नीरजनं त्याच्या मित्रांना रात्री घरातून निघताना सांगितलं की तो मारिया शिफ्टींगमध्ये मदत करत आहे. पण दुसऱ्या दिवशी सकाळी नीरज परतला नाही, तर त्याच्या मित्रांनी त्याला फोन केले. फोन मारियानं उचलला आणि सांगितलं की तो रात्री दीड वाजताच निघाला पण नीरज घरी पोहोचलाच नव्हता,
नीरजच्या कुटुंबानं तक्रार केली आणि पोलिसांनी नीरज ग्रोवरचा फोन जप्त केला. सगळीकडे नीरजचा शोध सुरु झाला. दरम्यान, त्याचा काहीच तपास लागत नसताना अचानक पोलिसांना मोबाइल टॉवरच्या रेकॉर्डनं एक असा क्लू मिळाला ज्यानं सगळा संशय हा मारियावर आला.
पोलिसांनी मारियाचा तपास केला आणि तिच्यावर पाळत ठेवली. त्यानंतर लक्षात आलं की नीरज बेपत्ता झाल्यापासून मारिया आणि तिचा बॉयफ्रेंड जेरोममध्ये जास्त फोन कॉल झाले. त्यानंतर पोलिसांनी मारियाच्या बिल्डिंगच्या वॉचमेनची चौकशी केली तर कळलं की मारिया आणि जेरोम हे रात्री एका बॅगमध्ये वजनदार वस्तू घेऊन गेले. त्यातून पोलिसांच्या लक्षात आलं की काही तरी झालंय. त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली आणि सखोल चौकशीनंतर एक भयावह सत्य उघड झालं. मारियानं सांगितलं की 8 मे रोजी नीरजची हत्या झाली. जेरोमला नीरजवर संशय होता. त्यामुळे नीरज मारियाच्या घरी असताना अचानक जेरोम आला. त्यानं नीरजला मारियाच्या बेडवर पाहिलं आणि त्यानंतर त्यांच्यात भांडण झालं आणि रागाच्या भरात त्याने नीरजला चाकूने ठार मारलं.
मारिया आणि जेरोम मॅथ्यू या दोघांनाही नीरजचा मृतदेह समोर असतानाच अनेकदा शरीरसंबंध ठेवले आणि नंतर त्याच्या शरिराचे 300 तुकडे करून सुनसान ठिकाणी नेऊन पेट्रोल टाकून जाळून टाकले. त्यादरम्यान, नीरजचा फोन हा मारियाच्या खिशात राहिला. फोन वाजल्यानंतर मारियानं खिश्यात फोन काढून पाहिलं की कोण कॉल करतंय. तर चुकून तो फोन रिसिव्ह झाला आणि या सगळ्या प्रकरणामुळे पोलिसांनी सगळा शोध घेण्यास सुरुवात तिच्यापासून केली आणि सत्य समोर आलं. या प्रकरणात मारियाला 3 वर्षांची शिक्षा झाली तर जेरोम मॅथ्यूला 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली.