Marathi News> मनोरंजन
Advertisement

एकेकाळी बड्या सेलिब्रिटीची गर्लफ्रेंड आज 50 सेकंदांसाठी घेतेय तब्बल 'इतकं' मानधन

आपल्या करिअरची निवड चुकली वाटतं, असंच वाटेल   

एकेकाळी बड्या सेलिब्रिटीची गर्लफ्रेंड आज 50 सेकंदांसाठी घेतेय तब्बल 'इतकं' मानधन

Nayanthara Net worth: एकेकाळी ज्या दिग्दर्शक- कोरिओग्राफरशी नाव जोडवलं गेलं, तिच अभिनेत्री आज तिच्या खासगी आयुष्यात अखेर सुखद वळणावर आली आहे. प्रेमाच्या नात्यात सुरुवातीला मिळालेल्या अपयशानंतर आता ही अभिनेत्री तिच्या जोडीदारासह लग्न करण्यास सज्ज झाली आहे. 

ही अभिनेत्री आहे, नयनतारा (Nayanthara). ‘डायना मरियम कुरियन’ असं तिचं खरं नाव. दाक्षिणात्य कलाजगतामध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत नयनताराचं नाव अग्रस्थानी येतं. (actress nayanthara takes whooping amount of fee for 50 seconds scene)

'चंद्रमुखी','इमाइका', 'वेलइक्करन', 'इमइक्का नोडिगल', 'कोलाइथुर कालम', 'जय सिम्हा' अशा चित्रपटांमध्ये तिनं भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली. 

जसजसा काळ पुढे गेला तसतसं नयनतारानं कलाजगतामध्ये कमालीचा जम बसवला. ती मागेल, त्या मानधनाचा आकडा तिला मिळूही लागला. सूत्रांच्या माहितीनुसार, एका जाहिरातीसाठी नयनतारानं 5 कोटी रुपये इतरं मानधन घेतलं होतं. 

दोन दिवस या जाहिरातीचं चित्रीकरण सुरु होतं. नयनतारा चित्रपटांसाठीसुद्धा 5 कोटी रुपये आणि त्याहूनही जास्त मानधन घेते. घसघशीत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या नयनतारा हिनं थिरुवला इथं एक आलिशान बंगला घेतला आहे, तर कोच्चीमध्ये तिनं एक फ्लॅटही घेतला आहे. 

71 कोटी रुपयांची संपत्ती असणाऱ्या नयनताराच्या दारी अनेक महागड्या कार उभ्या आहेत. नयनतारा चर्चेत येण्याचं आणखी एक कारण म्हणजे तिनं उचललेलं धर्मांतराचं पाऊल. 

दिग्दर्शक, कोरिओग्राफर आणि अभिनेता प्रभुदेवा याच्यावरील प्रेमाखातर नयनतारानं ख्रिस्तधर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारला होता. पण, 2012 मध्ये या नात्यात दुरावा आला आणि या दोघांच्याही वाटा वेगळ्या झाला. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by nayanthara (@nayantharaaa)

नयनतारा गेल्या काही काळापासून दिग्दर्शक विग्नेश शिवन याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. ही जोडी 9 जून रोजी विवाहबंधना अडकणार आहे. 

Read More